बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांबद्दल बोलायचे झाले, तर त्यात नर्गिस दत्तचे नाव आवर्जून घेतले जाते. अशात आज म्हणजे बुधवारी (दि. 3 मे)ला नर्गिस दत्त यांची पुण्यतिथी आहे. या निमित्त सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची बहीण प्रिया दत्त यांनी आई नर्गिसची आठवण काढली तसेच एक पाेस्टही शेअर केली आहे, जी साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.
संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांचे 3 मे 1981 रोजी म्हणजेच 42 वर्षांपूर्वी निधन झाले. अशा परिस्थितीत आई नर्गिसची आठवण करून संजयने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. संजय दत्तच्या बालपणीचा हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, ज्यामध्ये त्याची आई नर्गिस दत्त त्याला आपल्या मिठीत घेऊन आहे. तर बहीण प्रियाही त्याच्यासोबत दिसत आहे.
View this post on Instagram
या फोटोच्या कॅप्शनमध्ये संजय दत्तने लिहिले आहे की, ‘आई तुझी खूप आठवण येते, तुझे प्रेम आणि जिव्हाळा मला दररोज मार्गदर्शन करत आहे आणि तू मला शिकवलेल्या धड्यांबद्दल मी तुझा सदैव ऋणी आहे.’ अशाप्रकारे संजयने आईच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या मनातील गोष्ट सांगितली आहे.
संजय दत्तशिवाय आई नर्गिस दत्तच्या पुण्यतिथीनिमित्त मुलगी प्रिया दत्तनेही तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रियाने या व्हिडिओच्या सुरुवातीला एक मोठी नाेट लिहिली आहे, ज्यामध्ये प्रियाने लिहिले आहे की, “एवढ्या लहान वयात तुला गमावण्याचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे.”
View this post on Instagram
प्रिया पुढे म्हणाली, “मला तुमच्याकडून खूप प्रेम मिळाले आहे आणि बरेच काही शिकायला देखील, जे मला प्रत्येक कठीण क्षणी सकारात्मक राहायला शिकवतो.” व्हिडिओमध्ये प्रिया आणि तिची आई नर्गिस दत्तचे अनेक थ्रोबॅक फोटो आहेत. कॅप्शनमध्ये प्रियाने नर्गिस दत्त यांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारीख याचाही (1-6-1929) – (3-5-1981) समाविष्ट केला आहे.(bollywood actor sanjay dutt priya dutt remember her mother nargis on her death anniversary)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्याला शाहरुखसोबत घ्यायची हाेती सेल्फी, पण संतापलेल्या अभिनेत्याने केले ‘हे’ कृत्य
हौसेला मोल नाही आणि फॅशनला तोड नाही! घटस्फोट झाल्यानंतर चक्क ‘या’ अभिनेत्रीने केले डिवोर्स फोटोशूट