फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या अंतर्गत मुंबईत आयोजित केलेल्या फ्रेम्स 2023 ला सुरुवात झाली आहे. FICCI फ्रेम्स फास्ट ट्रॅकच्या 23 व्या आवृत्तीच्या पहिल्या दिवसाच्या उद्घाटन समारंभाला आयुष्मान खुराना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यादरम्यान तो ऑस्कर विजेत्या ‘एलिफंट व्हिस्पर्स‘ या चित्रपटाचे स्थुती करताना दिसला. मुंबईच्या ऊर्जेने त्याला पुढे जाण्यासाठी कशी प्रेरणा दिली याबद्दलही आयुष्मानने सांगितले.
अभिनेता आयुष्मान खुराना (ayushmann khurrana) म्हणाला, “मुंबईसारखे मोठे शहर माझ्यासाठी नेहमीच उर्जेचा स्रोत राहिले आहे. मी जेव्हा-जेव्हा कामासाठी किंवा शूटिंगसाठी बाहेर जाताे, तेव्हा मी ही ऊर्जा माझ्यासोबत घेऊन जातो आणि तीच मला पुढे ठेवते. मला आठवते जेव्हा 2008मध्ये मी मुंबईत आलो, तेव्हा मुंबईच्या मातीत पाय ठेवताच मला आपुलकीची जाणीव झाली. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यापासून ते ऑडिशनसाठी रांगेत उभं राहण्यापर्यंत, या शहराच्या ऊर्जेने मला सर्व त्रास सहन करण्यास मदत केली. ज्या शहराने मला दत्तक घेतले आणि मला खूप काही दिले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आज मी एवढ्या मोठ्या दिग्गजांसमोर पाहुण्यासारखा उभा आहे, त्यामध्ये मुंबईचाही यात हात आहे.”
‘एलिफंट व्हिस्पर्स’ या ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्री चित्रपटाबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला, “मला आठवतंय 10 वर्षांपूर्वी मी केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूला वन्यजीव अभयारण्यांसाठी गेलो होतो. त्यावेळी मला मानव आणि प्राणी यांच्यातील एक वेगळ्या प्रकारचे नाते दिसले. मी कधीच विचारही केला नव्हात की, 2023मध्ये संपूर्ण जगाला हे नाते पाहायला मिळेल आणि आपल्याला ऑस्कर पुरस्कार मिळेल. याचा अर्थ आपण आपल्या मुळांशी जितके अधिक जोडले जाऊ तितके आपण पुढे जाऊ. आपण जेवढे स्थानिक आहोत, तेवढी जागतिक कीर्ती आपल्याला मिळेल.”
हिंदी चित्रपटांच्या जागतिकीकरणाविषयी बोलताना आयुष्मान म्हणाला, “सध्या आपला फिल्म इंडस्ट्री जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे. स्वदेशी कला आणि कलाकारांना संधी मिळत असलेल्या युगातील मी अभिनेता आहे, याची मला भीती वाटते. गेल्या काही वर्षांत, भारताकडे एक रचनात्मक शक्ती म्हणून पाहिले जात आहे आणि आमच्या कलेचे जागतिक स्तरावर स्वागत होत आहे, त्यामुळे आम्हाला एक देश म्हणून विकसित होण्यास मदत होत आहे”.
आयुष्मान खुराना याच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘डाॅक्टर जी’, ‘ड्रिम गर्ल’, ‘बाला’, ‘शुभ मंगल सावधान’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे.(Bollywood actor ayushmann khurrana talks about his journey says connect with the roots will give you success)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धर्मेंद्र यांच्या घरी लवकरच वाजणार सनई! सनी देओलच्या मुलाने गुपचूप केला साखरपुडा?
नर्गिस यांच्या पुण्यतिथीनिमित्त संजय दत्तने काढली आईची आठवण, बहीण प्रियाने शेअर केला ‘ताे’ भावनिक व्हिडिओ










