अभिनेता आमिर खान आणि सलमान खान यांचा एक चित्रपट जो आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताे तो म्हणजे ‘अंदाज अपना अपना‘. लाेकांना हा काॅमेडी चित्रपट चांगलाच आवडताे. अशात आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सलमान आणि आमिरवर मोठा आरोप केला आहे. त्याचा चित्रपट फ्लॉप होण्यामागे हे दोन्ही सुपरस्टार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
खरे तर असे झाले की, 1994 साली आमिर खान (aamir khan) आणि सलमान खान (slaman khan) यांचा ‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चांगलाच फ्लाॅप ठरला. अशात आता 29 वर्षांनंतर या चित्रपटाचे निर्माते राजकुमार संतोषी यांनी माध्यमाशी संवाद साधताना सांगितले की, “अंदाज अपना अपना ही त्या काळात पूर्णपणे वेगळी स्टाेरी होती. यात रोमान्सपेक्षा कॉमेडी, एडवेंचर आणि ह्यूमर अधिक आहे. मात्र, लोकांना हा चित्रपट समजायला वेळ लागला. ”
राजकुमार म्हणाले की, “29 वर्षांपूर्वी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा वितरक देखील नवीन होते.” राजकुमार यांनी उघड केले की, “दोन्ही मुख्य कलाकारांनी चित्रपटाचे प्रमोशन केले नाही, सलमान किंवा आमिर दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहरात नव्हते.” निर्माते पुढे म्हणाले की, “ते देखील दुसरा चित्रपट शूटिंग करत हाेते. चित्रपटाशी संबंधित काेणतीही एक्टिविटी न झाल्याचे त्यांनी सांगितले.”
‘अंदाज अपना अपना’च्या रिमेकच्या शक्यतेबद्दल विचारले असता राजकुमार संतोषी म्हणाले की, ‘जो कोणी या चित्रपटाचा रिमेक करण्याचा प्रयत्न करेल त्याला त्रास होईल.’ निर्माता पुढे म्हणाले, “रिमेक करायला काहीही वाव नाही. कारण, आजही हा चित्रपट ताजा दिसतो. या सदाबहार चित्रपटाचा जो कोणी रिमेक करण्याचा प्रयत्न करेल तो डुबून जाईल. कारण, असा चित्रपट बनवणे शक्य नाही.” (rajkumar santoshi accused actor slaman khan and actor aamir khan for andaz apna apna got flopped)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चिंतेमुळे 125 किलो वाढलं वजन अन् श्वास घेण्यास हाेत हाेता त्रास; पारस छाबराचा माेठा खुलासा, म्हणाला…
रकुल प्रीत सिंगने स्विम सूट घालून -15 डिग्री सेल्सिअस पाण्यात मारली उडी; चाहते म्हणले, ‘आग लावली’