‘बालिका वधू‘ मधील गेहना बिंदी म्हणून घराघरात प्रसिद्ध झालेल्या नेहा मर्दाने एप्रिलमध्ये एका मुलीला जन्म दिला. वेळेपूर्वी प्रसूती झाल्यामुळे अभिनेत्रीला तिच्या प्रसूतीच्या वेळी अनेक गुंतागुंतांना सामोरे जावे लागले होते. अभिनेत्रीच्या मुलीचा जन्म अवघ्या साडे सात महिन्यात झाला. 7 एप्रिल 2023 रोजी आपल्या लेकीचे स्वागत करणारी नेहा मर्दा आजकाल मातृत्वाचा खूप आनंद घेत आहे. अलीकडेच एका संवादात अभिनेत्रीने सांगितले की, ती कशाप्रकारे आपल्या मुलीची काळजी घेते, यासोबतच या अभिनेत्रीने 20 दिवस आपल्या मुलीला जवळ न घेण्याचे दु:खही व्यक्त केले. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…
नेहा मर्दा (neha marda) हिने माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत आपल्या वेदना व्यक्त करताना सांगितले की, “मला मातृत्वाचा आनंद खूप उशिरा अनुभवायला मिळाला. कारण, पहिल्या 20 दिवसात मला माझ्या मुलीपासून दूर राहावं लागलं. मला तिला घेण्याची परवानगी नव्हती. मी तिथेच होते. मात्र, मला फक्त तिला भेटून बघण्याची परवाणगी हाेती. मला माझे दूध देखील बाटलीत पाठवावे लागायचे.”
View this post on Instagram
नेहा मर्दा पुढे म्हणाली, ‘ती एनआयसीयूमध्ये होती, त्यामुळे मला तिला थेट आहार देण्याची परवानगी नव्हती, परंतु देवाच्या कृपेने तिने उपचाराचा प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार केला आणि आता ती पूर्णपणे बरी आहे. ती प्रीमॅच्युअर बेबी होती आणि अवघ्या साडेसात महिन्यांची होती .तिला अनेक परीक्षांना सामोरे जावे लागले, ज्यात ती देवाच्या कृपेने यशस्वी झाली.’ याशिवाय नेहा मर्दाने असेही सांगितले की, ‘ती तिच्या बाळाला स्तनपान करत आहे आणि तिला तिचे वजन कमी करण्याची घाई नाही.’
मंडळी नेहा मर्दाने 2012 मध्ये लग्न केले आणि लग्नाच्या 11 वर्षानंतर तिने तिच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. (tv balika vadhu fame neha marda talk about those difficult time when she stay away from newborn daughter for 20 days)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“जरा सेटपर्यंत सोडतो का?” अमिताभ बच्चन यांनी चक्क रस्त्यावरच्या अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट
अनारकली ड्रेसमध्ये हिना खानचे खुलले साैंदर्य, फाेटाे व्हायरल










