बॉलिवूडमधील विनोदी कलाकार सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले हे दोघेही अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. या गोष्टीची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या सगळ्या प्रेक्षकांना दिली होती. परंतु आता या दोघांनीही त्यांच्या नात्याला एक नवीन नाव दिले आहे. त्या दोघांनी साखरपुडा केला असल्याची माहिती सोशल मीडियावर त्यांनी दिली आहे. त्या दोघांच्या बाबतीत ही गोष्ट ऐकून त्यांचे चाहते खूपच खूश झाले आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.
सुगंधा ही ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये काम करत होती. परंतु तिने संकेत सोबतच्या नात्याचा कोणालाही सुगावा लागू दिला नाही. पण अचानक जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल तीने सगळ्यांना सांगितले, तेव्हा मात्र सगळेच खूप आश्चर्यचकित झाले. सुगंधा आणि संकेतने अनेक शोमध्ये एकत्र काम केले आहे. ते एकमेकांना आधीपासूनच खूप चांगले ओळखत आहे. त्यांच्यातील मैत्रीने प्रेमाचा टप्पा कधी पूर्ण केला आहे, हे त्यांना देखील कळले नाही. नकळत ते एकमेकांच्या प्रेमात आकंड बुडाले.
सुगंधाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे की, तिने आणि संकेतने साखरपुडा केला आहे. तिने त्या दोघांचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तो फोटो वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात तिच्या साखरपुड्याची अंगठी दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शन दिले आहे की, “आयुष्यभरासाठी.” त्यांचे चाहते त्यांच्या या फोटोला खूपच पसंती दर्शवत आहेत. तसेच सगळेजण त्यांना शुभेच्छा देखील देत आहे.
सुगंधा आणि संकेत या दोघांनाही ‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये काम केले आहे. सुगंधा ही लता मंगेशकर आणि कंगना रणौत यांचा खूप चांगला अभिनय करते. ही जोडी शेवटची सुनील ग्रोवरच्या ‘गॅंग्स ऑफ फिल्मिस्तान’ मध्ये दिसली होती. तसेच संकेत देखील खूप चांगला अभिनेता आहे. त्याने संजय दत्तपासून ते सलमान खानपर्यंत अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. तसेच त्याने अनेक कॉमेडी शो देखील केले आहे.