Monday, September 14, 2026
Home मराठी “मुलगी झाली हो मधला तुफान गाजलेला…” अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

“मुलगी झाली हो मधला तुफान गाजलेला…” अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय विवादित आणि स्पष्टवक्ता स्वभाव असलेले अभिनेते म्हणजे किरण माने. मालिका आणि चित्रपटात त्यांनी अनेक लहान भूमिकांमधून काम केले. मात्र ‘मुलगी झाली हो’ या मालिकेने आणि मालिकेसोबत झालेल्या त्यांच्या वादामुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील कलाकारांनी, निर्मात्यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले आणि त्यांना मालिकेतून अचानक काढले. त्यांनी देखील मालिकेवर अनेक आरोप केले. मात्र या वादामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्ध आणि लोकप्रियता मिळाली आणि ते लाइमलाईट्मधे आले. पुढे त्यांनी बिग बॉस मराठीमध्ये हजेरी लावत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

असे हे किरण माने सोशल मीडियावरही कमालीचे सक्रिय आहे. त्यांच्या प्रत्येक पोस्ट खूप व्हायरल होतात आणि त्यावर असंख्य प्रतिक्रिया देखील येतात. अशातच आता किरण माने यांनी एक नवीन पोस्ट केली असून, ती चांगलीच गाजत आहे. किरण माने यांनी त्यांच्या एका नव्या मालिकेबद्दल यात लिहिले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, “…नविन मालिका, नवी भुमिका !

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

सहसा माझ्या वयाच्या पुरूष कलावंतांना मालिकांमध्ये फारसं काही वेगळं करायला मिळत नाही. मालिका या हिराॅईनभोवती फिरणार्‍या असतात. अशा परिस्थितीतही मला आश्चर्यकारकरित्या लक्षवेधी कॅरॅक्टर्स साकारायला मिळाली, जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. ‘माझ्या नवर्‍याची बायको’मधला राधिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहाणारा भाऊ शिरीषदादा… ‘मुलगी झाली हो’ मधला तुफान गाजलेला रांगडा, हळवा, ‘ॲंग्री यंग मॅन’ विलास पाटील… हे परस्परविरोधी धाटणीचे दमदार रोल्स करायला मिळणं हे माझ्यामधल्या अभिनेत्याला सुखावणारं होतं. विशेष म्हणजे दोन्ही मालिकांनी टी.आर.पी. चे रेकाॅर्डब्रेक उच्चांक गाठले होते !

…आता मी छोट्या पडद्यावर आत्तापर्यन्त साकारलेल्या भुमिकांपेक्षा खूप वेगळा माणूस साकारतोय. तुम्ही याआधी मला अशा रोलमध्ये कधी इमॅजिनही केलं नसेल ! शुटिंगला नुकतीच सुरूवात झालीय. खूप मजा येतीये. कुठल्या वाहिनीवर,कधीपासून आणि किती वाजता याबद्दल लवकरच कळवेन… ”

किरण यांच्या या पोस्टवर नेटकाऱ्यानी कमेंट्स करत त्यांना या नवीन मालिकेसाठी शुभेच्छा देताना आम्ही आतुर असल्याचे देखील सांगितले आहे. मात्र किरण यांनी त्यांची ही मालिका, कधी, कुठे येणार याबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. बऱ्याच महिन्यांनी किरण माने पुन्हा मालिकेमध्ये झळकणार असल्यामुळे त्यांचे चाहते नक्कीच खुश असणार.

हे देखील वाचा