Saturday, March 21, 2026
Home अन्य पैसाच पैसा! टेलिव्हिजनवरील हे कलाकार एका दिवसाचे घेतात ‘इतके’ लाख मानधन, कपिल शर्मातर…

पैसाच पैसा! टेलिव्हिजनवरील हे कलाकार एका दिवसाचे घेतात ‘इतके’ लाख मानधन, कपिल शर्मातर…

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत, ते त्यांच्या एका चित्रपटासाठी किंवा एका शोसाठी देखील कोटींमध्ये पैसे घेतात. त्याचप्रमाणे टेलिव्हिजनमध्ये देखील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची फी वाचून तुम्ही थक्क व्हाल. आजकाल बघायला गेलं तर टीव्ही कलाकारांची लोकप्रियता बॉलीवूड कलाकारांपेक्षाही जास्त आहे. टीव्हीवरील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची फॅन फॉलोविंग काही बॉलीवूड कलाकारांपेक्षाही जास्त आहे. असेच काही कलाकार आहे ज्यांची फी देखील बॉलिवूड कलाकारांप्रमाणे आहे.

साक्षी तंवर
अभिनेत्री साक्षीने टेलिव्हिजनवर अनेक मालिकांमध्ये आणि जाहिरातींमध्ये देखील काम केले. दंगल या चित्रपटातील फेम साक्षी तंवर ही एका एपिसोडसाठी 1.25 लाख एवढी फी घेते.

मनीष पॉल
अनेक रियलिटी शोमध्ये काम केलेला अभिनेता म्हणजे मनीष पॉल. त्याने अनेक रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन केले आहे. मनीष हा देखील टेलिव्हिजनवरील एक महागडा अभिनेता आहे. तो प्रत्येक एपिसोडसाठी 1.25 लाख एवढी फी घेतो.

राम कपूर
बडे अच्छे लगते हो,कसम से, करले तू भी मोहब्बत यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करून,आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे टेलिव्हिजनवरील अभिनेता अभिनेता म्हणजे राम कपूर. ते एका दिवसासाठी जवळपास 1. 25 लाख एवढी फी घेतात.

शिवाजी साटम
सीआयडी फेम अभिनेता शिवाजी साटम हे देखील टेलेव्हीजनवर सगळ्यात जास्त फी घेतात. त्यांच्या सीआयडी मधील एसीपी या पात्राने सर्वत्र ओळख निर्माण केली आहे, ते एका एपिसोडसाठी एक लाख रुपये घेतात.

हिना खान
हिना खान ही तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात एका प्रोजेक्टसाठी 80 हजार ते एक लाख एवढी फी घ्यायची. पण आता तिची लोकप्रियता खूप वाढल्याने ती एका एपिसोडसाठी कमीत कमी दोन लाख रुपये एवढी घेते.

सुनील ग्रोवर
एका विनोदी कलाकारापासून ते अभिनेत्या पर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुनील ग्रोवरला खुप कष्ट करावे लागले. तो अनेक वर्ष ‘द कपिल शर्मा शो’मध्ये होता. यानंतर त्याने अनेक रियालिटी शोमध्ये आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सगळ्यांच्या मनात एक वेगळीच ओळख निर्माण करणारा सुनील एका दिवसासाठी जवळपास दहा ते बारा लाख एवढी रक्कम घेतो.

कपिल शर्मा
टेलिव्हिजन जगतात सर्वत्र विनोदाचा बादशहा म्हणून ओळखला जाते तो म्हणजे कपिल शर्मा. कपिल शर्मा हा देखील टेलिव्हिजनवरील एक महागडा अभिनेता आहे.तो त्याच्या एपिसोडसाठी 80 लाख एवढी रक्कम घेतो.

हे देखील वाचा