Friday, March 20, 2026
Home बॉलीवूड दिवंगत अभिनेता सुशांतचा बायोपिक संकटात; जवळच्या ‘या’ व्यक्तीने केली चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, दिल्ली उच्च न्यायालयाची निर्मात्यांना नोटीस

दिवंगत अभिनेता सुशांतचा बायोपिक संकटात; जवळच्या ‘या’ व्यक्तीने केली चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, दिल्ली उच्च न्यायालयाची निर्मात्यांना नोटीस

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करणार्‍या निर्मात्यांना, दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. दिवंगत अभिनेत्याचे वडील केके सिंग यांनी, आपल्या मुलावर बनत असलेल्या चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. याच याचिकेवर निर्णय देत, न्यायालयाने निर्मात्यांना नोटीस पाठविली आहे.

गेल्या वर्षी १४ जून रोजी बातमी आली की, युवा अभिनेता सुशांतसिंग राजपूतने या जगाचा निरोप घेतला आहे. त्याने आत्महत्या केली होती. अभिनेत्याचा मृतदेह त्याच्या मुंबईस्थित फ्लॅटमध्ये सापडला होता. या प्रकरणाला आता एक वर्ष होत आले आहे. तेव्हापासून सातत्याने या प्रकरणी तपास सुरू आहेत. यात तीन केंद्रीय एजन्सी देखील सामील झाल्या होत्या. कुटुंबीय, चाहते आणि बिहार सरकारच्या सतत मागण्यांनंतर, हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या हातातून काढून घेत, सीबीआयकडे सोपवण्यात आले.

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात तपास यंत्रणा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, ही आत्महत्या होती की हत्या होती. कारण प्रचंड आत्मविश्वासी असलेल्या अभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी कोणालाच खरी वाटत नव्हती. कालांतराने, तपासणीत सीबीआयनंतर ईडी आणि एनसीबीही दाखल झाले. एनसीबीचा तपास अद्याप सुरू आहे. एनडीपीएस न्यायालयात एजन्सीने ३३ आरोपींविरूद्ध आरोपपत्रही दाखल केले असून, त्यामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ यांच्यासह ३३ जणांवर आरोप केले गेले आहेत. एनसीबीने केलेल्या या आरोपपत्राची एनडीपीएस न्यायालयाने प्रशंसाही केली. परंतु याची पुढील सुनावणी अद्याप बाकी आहे.

सुशांतच्या निधनानंतर देशभरातील चाहते सतत त्याची आठवण काढत दुःख व्यक्त असतात. अशा परिस्थितीत काही निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्याच्यावर बायोपिक बनवण्याचा विचार केला. चित्रपट निर्माता विजय शेखर हा चित्रपट बनवणार आहेत. तसेच, या चित्रपटाचे पोस्टरही रिलीझ करण्यात आले आहे.

सुशांतचा बायोपिक प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपट पार्श्वभूमी नसलेला कलाकार यात पाहायला मिळणार आहेत. सोबतच घराणेशाहीवर जोरदार लक्ष्य करण्याचा दावाही केला होता. त्यानंतर बातमी आली की सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातून प्रेरित चित्रपटाची निर्मिती सरला सारागोई आणि राहुल शर्मा करणार आहेत, तर दिलीप गुलाटी याचे दिग्दर्शन करतील.

बायोपिकबद्दल असे म्हटले जात होते की, सुशांत सिंगची भूमिका अभिनेता झुबैर खान साकारेल, तर रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया शुक्ला साकारेल. पण आता सुशांतची ही बायोपिक संकटात सापडलेली दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगणाऱ्या अभिनेत्रीने केला बोल्ड फोटो शेअर, म्हणाली ‘…मी व्हर्जिन आहे?’

-भारीच! चौदा वर्षांपुर्वी अभिषेकबरोबर झालेल्या लग्नात ऐश्वर्या रायने घातली होती एवढ्या लाखांची साडी

-काय सांगता! करन-अर्जुनमधील शाहरुखची प्रेयसी झालीय साध्वी, बॉलीवूडला ठोकलाय कायमचा राम-राम

हे देखील वाचा