बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ‘ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ दिसणार आहे. त्याचवेळी, चाहते अभिनेत्याच्या आगामी ‘OMG 2‘ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण, या चित्रपटाचा पहिला भाग चाहत्यांना खूप आवडला होता. अशात आता ‘OMG 2’बद्दल नवीन अपडेट आले आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट सांगितली आहे. चला तर मग जाणून घेऊया हा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय.
अक्षय कुमार (akshay kumar) याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘OMG 2’ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्सद्वारे समोर आले होते की, निर्माते चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. मात्र, आता बॉलीवूडच्या खिलाडीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ‘OMG 2’चे पोस्टर जारी करताना चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
अक्षय कुमारने स्वतः त्याच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्याला ओळखने कठीण झाले आहेत. अशात अक्षयची ही पोस्ट पाहल्यानंतर चाहते खूप उत्सुक दिसत आहेत.
View this post on Instagram
‘OMG 2’ हा चित्रपट शिक्षण व्यवस्थेवर आधारित असणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती विपुल शाह, राजेश शाह, अश्विन वर्दे आणि अक्षय कुमार यांनी मिळून केली आहे, तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केले आहे.
अशात 11ऑगस्टला केवळ ‘OMG 2’ आणि ‘गदर 2’च नाही, तर रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा सिनेमाही रिलीज होणार आहे. अशा स्थितीत तिन्ही चित्रपटांची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या तिन्ही चित्रपटांसाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत.( oh my god 2 release date announcement akshay kumar film will release on 11 august)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अल्पवयीन मुलीवर बला’त्कार केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायकाला अटक, सोशल मीडियावर फोटो केले पोस्ट
दीपिका कक्करने जुळ्या मुलांना दिला जन्म? पती शोएब इब्राहिमने केला खुलासा