Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘Bigg Boss OTT 2’मध्ये स्पर्धकांनी ओलांडल्या सर्व मर्यादा; एकमेकांच्या जवळ गेले आणि…

बिग बॉस ओटीटी 2‘ सुरू झाल्यापासूनच चांंगलाच चर्चेत आहे. ‘बिग बॉस ओटीटी’चा सीझन 2 सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक भागांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आतापर्यंत या शोमध्ये बरेच वाद झाले आहेत. नुकतेच पुनीत सुपरस्टारला घराच्या मालमत्तेशी छेडछाड केल्याप्रकरणी घरातून हाकलून देण्यात आले होते. आता आकांक्षा पुरी आणि जैद हदीदचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

सलमान खानच्या टिव्ही शोमध्ये डेअर गेम खेळला जातो. आत्तापर्यंत तुम्ही त्यात प्रेम, ब्रेकअप आणि वाद झालेला बघितल असेल. मात्र दुसऱ्या सीझनमध्ये एक लजिरवाना प्रकार समोर आला आहे. यात दोन स्पर्धक लिप-लाॅक किस करताना दिसत आहेत. हे स्पर्धक दुसरे कोणी नसून आकांक्षा पुरी (Akanksha Puri) आणि जैद हदीद (Zaid Hadid) हे आहेत. या व्हिडिओमध्ये सर्व घरातील सदस्य बागेत उभे आहेत आणि आकांक्षा पुरी आणि जैद हदीद सर्वांसमोर एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

खरंतर अविनाशने दोघांना एक टास्क दिला होता. त्यानंतर जैद हदीद आणि आकांक्षा पुरी यांनी एकमेकांना किमान 30 सेकंद किस केले. मात्र, टास्क करत असताना दोघेही एकमेकांना रोखू शकले नाहीत. किस करताना ते इतके तल्लीन झाले की, घरातील सर्व सदस्य आजूबाजूला आहेत हे विसरले होते. हे सर्व पाहून घरातील बाकीच्यांना अस्वस्थ वाटू लागते. त्यावेळी मग पूजा भट्ट त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते.

 तर दुसरीकडे सोशल मीडियावर लोकांना आकांक्षा पुरी आणि जैद हदीदची ही वृत्ती अजिबात आवडली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी दोघांनाही ट्रोल करायला सुरुवात केली. त्याचवेळी नेटकऱ्यांनी “बिग बॉस  ओटीटीला ॲडल्ट शो म्हणून जाहीर करावं,” अशी टिका केली आहे. (In ‘Bigg Boss OTT 2’ contestants Zaid Hadid and Akanksha Puri crossed all the limits)

अधिक वाचा- 
‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये इंटिमेट सीन दिल्याबद्दल अभिनेत्रीचा माेठा खुलासा; म्हणाली, ‘मी घाबरायचे आणि…’
समुद्र किनाऱ्यावरील आलिया भट्टचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नीना गुप्ता म्हणाल्या…

हे देखील वाचा