अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर एनसीबी नावाचे वादळ घोंगवायला सुरूवात झाली. सुशांतच्या मृत्यूची चौकशी करताना ड्रग्जचा संबंध समोर आल्यानंतर अनेक मोठमोठे कलाकार या प्रकरणात अडकले. याच केसमध्ये मार्च 2021 मध्ये अभिनेता आणि बिग बॉस फेम एजाज खानला अटक करण्यात आली होती. नुकतेच एजाज खान या प्रकरणा विषयी एक अनुभव शेअर केले आहे.
ड्रग्ज प्रकरणात अटक झालेला अभिनेता एजाज खान ( Eijaz Khan)19 जून रोजी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला. ‘बिग बॉस 7‘चा स्पर्धक एजाज खान याने माध्यमांशी बोलताना 26 महिने तुरुंगात राहण्याचा त्याचा हृदयद्रावक अनुभव शेअर केला. यादरम्यान एजाजने हा एक वेदनादायक अनुभव असल्याचे सांगितले. त्याने तुरुंगात आपण काय खाल्ले याबद्दल सांगितले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तेथील परिस्थिती पाहून डिप्रेशनमध्ये गेल्याचे एजाजने सांगितले.
एजाज म्हणाला की, “ही दोन वर्षे माझ्यासाठी खूप कठीण होती. मी सत्य सांगितले आणि त्यामुळे माझेच लोक माझ्यापासून दुरावले. मी 26 महिने माझ्या कुटुंबाशिवाय राहिलो, माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब होती. मी देवाचे आभार मानतो की, त्याने मला माझ्या कुटुंबासाठी जिवंत ठेवले आणि मला त्या परिस्थितीशी लढण्याचे धैर्य दिले.”
तसेच पुढे बोलताना एजाज सांगतात की, “जेलमध्ये 400 कैद्यांसाठी फक्त तीन शौचालये होती आणि ती नेहमी भरलेली असायची. मी जेलमध्ये खूप पुस्तके वाचली, तिथे खूप काही शिकलो. मला प्रत्येक धान्याची आणि भाजीची किंमत कळली. मी तिथे त्या कैदी आणि गुंडांसह राहिलो. तेव्हा त्यांनी मला जीवनाचे महत्त्व शिकवले. त्या सुक्या रोट्या आणि भात मी दगडासारखा खायचो. शिवाय उंदीर आणि किड्यांनी भरलेली डाळही मी खायचो. आज मला कुणी थोडे जरी जेवण दिले तर मी आनंदाने खाईन.”
यादरम्यान, मला माणूसकी काय असते हे समजले. या टप्प्यात मला अनेक प्रकारची लोक समजली. जी लोक माझी होती त्यांना मला कठीण काळात साथ दिली. म्हणूनच या परिस्थितीतही मी मैत्री केली. मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्यापैकी अनेकांनी मला सोडून दिले. तर काहींनी मला आणि माझ्या कुटुंबाला पाठिंबा दिला. मी जेलमध्ये का गेलो हे मला आजपर्यंत कळलं नाही. मी विमानतळावरून परतत होतो, त्यावेळेस काही अधिकारी तिथे आले. त्यांनी माझी चौकशी करण्यासाठी मला पोलिस ठाण्यात नेले आणि काही क्षणात त्यांनी मला तुरुंगात टाकलं.”, असेही एजाज खानने सांगितले. (‘Bigg Boss’ famous actor Eijaz Khan told the shocking stories of prison)
अधिक वाचा-
–सोज्वळ जान्हवीच्या बोल्ड फोटोंनी चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एकदा फाेटाे पाहा
–‘अहो लय दुखत…’ नेटकऱ्याच्या ‘त्या’ प्रश्नावर सिद्धार्थ चांदेकरने दिले भन्नाट उत्तर, पोस्ट व्हायरल