Sunday, April 14, 2024

फटाके वाजवा रे! एजाज खान अन् पवित्रा पुनिया अडकणार लग्न बंधनात; अशी आहे लव्हस्टाेरी

बिग बॉस या टीव्ही शोमध्ये अनेक स्टार्स ऐकमेकांच्या प्रेमात पडतात. अशातच आता ‘बिग बॉस 14‘ चे स्पर्धक असलेले एजाज खान आणि पवित्रा पुनिया देखील लग्न करणार आहेत. दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. काही महिन्यांपूर्वी एजाज खानने पवित्राला लग्नासाठी प्रपोज केले होते. ज्याला पवित्राने हो म्हटले होते. आता दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. पवित्रा पुनियाने माध्यमाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नाच्या तारखेबद्दलही चर्चा केली आहे. दोघेही लवकरच लग्नाचा निर्णय घेणार असल्याचे पवित्राने मुलाखतीत सांगितले.

पवित्रा हिने सांगितले की, “साखरपुडा प्रमाणेच आम्ही अचानक लग्न करू.” पवित्रा आणि एजाजची ऑक्टोबरमध्ये एंगेजमेंट झाली. अचानक या टीव्ही कपलने त्यांच्या एंगेजमेंटचा फोटो टाकून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता दोघेही लग्नासाठी सज्ज झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pavvitra Punia (@pavitrapunia_)

पवित्राने मुलाखतीत सांगितले की, “आम्ही लग्नाबाबत कोणतीही योजना करण्याच्या मनस्थितीत नाही. याबाबत आमचा उद्देश स्पष्ट आहे. एंगेजमेंट प्रमाणे आम्ही अचानक लग्न करू आणि सर्वांना याची माहिती होईल. याबाबत आम्ही कोणतीही विशेष योजना आखत नाही. जेव्हा ते व्हायला हवे तेव्हा ते होईल. लग्नानंतर मी स्वतः लोकांना याबाबत माहिती देईन. त्याआधी मला तारखेबद्दल काही बोलायचे नाही.” एजाज खानने ऑक्टोबरमध्ये पवित्रा पुनियाला लग्नासाठी प्रपोज केले होते. इथून दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pavvitra Punia (@pavitrapunia_)

एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांची प्रेमकहाणी बिग बॉस 14 पासून सुरू झाली. तेव्हापासूनच दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. प्रेक्षकांना दोघांचीही केमिस्ट्री खूप आवडते. (bollywood actor eijaz khan reveals wedding plans with actress pavitra punia discloses marriage date love story starts from bigg boss )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेंकिग! दाक्षिणात्य दिग्गज अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कलाविश्वावर शाेककळा

डिप्रेशनमध्ये होती अभिनेत्री! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासाेबत 15 दिवस आधी झाले हाेतं ब्रेकअप, वाचा संपूर्ण किस्सा

हे देखील वाचा