Sunday, October 1, 2023

‘अहो लय दुखत…’ नेटकऱ्याच्या ‘त्या’ प्रश्नावर सिद्धार्थ चांदेकरने दिले भन्नाट उत्तर, पोस्ट व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील डॅशिंग अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखला जातो. सिद्धार्थ मराठी चित्रपटसृष्टीत सतत चर्चेत असतो. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. त्याच्या अभिनयाने आणि लूकने तो सर्वांनाच वेड लावत असतो. तो वैयक्तिक आयुष्य असो नाहीतर त्याचे व्यावसायिक आयुष्य असो तो नेहमीच त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियामार्फत माहिती देत असतो. सिद्धार्थचे फोटो देखील सोशल मीडियावर वेगाने सर्वत्र व्हायरल होत असतात. अशातच त्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे.

सिद्धार्थचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करताना आहेत. व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, “मी माझ्यासाठी परफेक्ट इन्स्टाग्राम फिल्टर शोधत आहे.” तसेच, या कॅप्शनच्या शेवटी “हो रूट कॅनल झालंय” असे सिद्धार्थने लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ इन्स्टाग्रामवर वेगवेगळे फिल्टर लावताना दिसत आहे. त्यावर नेटकरी कमेंटचा वर्षाव करत आहेत.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थने एक दाढ काढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. कमेंट करताना एका युजरने म्हटले आहे, “रागवू नकोस, पण तुझी दाढ योग्यवेळी लावून घे”, यावर बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, “टाकलाय करायला…” दुसऱ्याने लिहिले की, “तू पण दाढ काढली आहेस?” यावर सिद्धार्थ म्हणाला की, “अहो लय दुखत होती…”

 सिद्धार्थ चांदेकर विषयी बोलायचे झाले तर, सिद्धार्थने 2010 साली अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केला आहे. त्यांनतर सिद्धार्थने ‘क्लासमेट’, ‘वजनदार’, ‘झिम्मा’, ‘बस स्टॉप’, ‘सिटी ऑफ ड्रिम’, ‘रणांगण’, ‘हिरकणी’ या सारख्या चित्रपटात काम करून त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. (Marathi actor Siddharth Chandekar’s social media post goes viral)

अधिक वाचा- 
‘आलियाने रस्त्यावर पडलेली चप्पल उचली अन्…’ अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीचं सोशल मीडियावर होतंय कौतुक
“मला स्त्रियांचे शरीर आवडते” राम गोपाल वर्मा यांनी ‘या’ अभिनेत्रीला लग्नाला नकार देताना केला होता खुलासा

हे देखील वाचा