Wednesday, January 15, 2025
Home बॉलीवूड किंग खानचा धमाका! ‘जब मैं व्हिलन बनता हूं…’, बहुचर्चित ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित

किंग खानचा धमाका! ‘जब मैं व्हिलन बनता हूं…’, बहुचर्चित ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित

शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. शाहरुख खान स्टारर ‘जवान‘ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून 9 दिवस बाकी आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर चाहते लक्ष ठेवून आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याच्या ट्रेलरचीही आतुरतेने वाट पाहिली जात होती. जवानचा ट्रेलर रिलीज झाला आहे, जो खूपच मस्त आहे. स्वत: शाहरुख खानने सोशल मीडियावर जवानचा ट्रेलर लॉन्च करून चाहत्यांना हा आनंदाची बातमी दिली आहे.

बरेच दिवस चाहते ‘जवान’च्या (Jawan) ट्रेलरची वाट पाहत होते. ‘पठाण’ नंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दार ठोठावणार आहे. त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाबाबत चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग परदेशात सुरू झाले असून, या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरूखचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

शाहरूख खानने शेअर केलेला हा ट्रेलर 2 मिनिट 45 सेकंदाचा आहे. या ट्रेलरने चाहत्यांची उसुक्ता आणखी वाढवली आहे. हा ट्रेलर तुमच्याही मनाला चटका लावेल. ट्रेलरची सुरुवातील शाहरुख खानने एकामागून एक लढाई हरणाऱ्या राजाची कहाणी सांगितली आहे. त्याला प्रचंड भूक लागली आहे, इतकचं नाही तर त्याला पाणी देखील मिळालेले नाही. त्यामुळे तो प्रचंड रागवला आहे.

यामध्ये शाहरूख खलनायकाच्या भूमिकेत दिसतो. जो मुंबईत मेट्रो हायजॅक करतो. टक्कल पडलेल्या शाहरुख खानचे हे खतरनाक पात्र पाहूण तुम्ही देखील घाबरून जाल. ‘जवान’च्या ट्रेलरमध्ये शाहरुख खान ‘पठाण’पेक्षाही खतरनाक अॅक्शन करताना दिसत आहे. ‘जवान’च्या ट्रेलर जसजसा पुढे सरकतोय, तसतसा शाहरुख खानची डॅशिंग अॅक्शनही पाहायला मिळत आहे. तो विजय सेतुपतीपासून सुरक्षा दलात काम करणाऱ्या नयनतारा आणि सान्या मल्होत्रा ​​ते सुनील ग्रोव्हरपर्यंत सर्वांना कसा त्रास देतो हे स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत शाहरुख खानसोबत भांडताना दिसत आहे. (The trailer of Shah Rukh Khan’s movie ‘Jawaan’ has been released)

अधिक वाचा- 
आज कोट्यवधींचा मालक असणाऱ्या राजकुमार रावने एकेकाळी काढलेत 18 रुपयात दिवस; एकदा वाचाच
‘माझ्या वाढदिवसाला येशील का?’, चाहत्याला उत्तर देत सई ताम्हणकर म्हणाली, ‘वरण भात आणि…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा