सना सईद (Sana saeed) एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे जिने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम केले आहे. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सनाचा जन्म 22 सप्टेंबर 1988 रोजी मुंबईत झाला. सनाने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून पदार्पण केले. आपल्या क्यूट लूकने प्रेक्षकांना भुरळ घालणारी सना आता मोठी झाली असून ती खूप ग्लॅमरस झाली आहे.
सना सईदने शाहरुख खान, सलमान खान, काजोल, राणी मुखर्जी स्टारर ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात अप्रतिम अभिनय दाखवला. या चित्रपटात अंजली नावाच्या मुलीची भूमिका साकारून सना रातोरात प्रसिद्ध झाली.
यानंतर सनाने ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘बादल’ या चित्रपटांमध्येही काम केले, पण अचानक सनाने या चित्रपटांपासून दुरावले. बराच काळ पडद्यापासून दूर राहिल्यानंतर सनाने टीव्ही शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
View this post on Instagram
2008 मध्ये ती ‘बाबुल का आंगन छोटे ना’ सारख्या मालिकांमध्ये दिसली होती. याशिवाय ती ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होत राहिली. सना सीझन 6, 7 आणि 9 मध्ये दिसली होती. टीव्हीनंतर सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री बनलेल्या सना सईदने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटात काम केले होते, मात्र या चित्रपटात तिला ‘कुछ कुछ होता है’ची लोकप्रियता मिळवता आली नाही.
सना सईद सध्या अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. सना इंस्टाग्रामवर एक एक ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सना सईदने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्या कुटुंबीयांना लहान कपडे घालणे आवडत नाही.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आर्यन खान प्रकरणावर आई गौरी खानचे वक्तव्य; म्हणाली, ‘आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो…’
अक्षय कुमारसोबत काम करून रातोरात स्टार झालेली शांतीप्रिया, पण अचानक…
सर्वांचं सोडा, थेट पती सैफसमोरच करीनाने केले होते एक्स बॉयफ्रेंड शाहिदला किस, व्हिडिओ व्हायरल