Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड आज कोट्यवधींचा मालक असणाऱ्या राजकुमार रावने एकेकाळी काढलेत 18 रुपयात दिवस; एकदा वाचाच

आज कोट्यवधींचा मालक असणाऱ्या राजकुमार रावने एकेकाळी काढलेत 18 रुपयात दिवस; एकदा वाचाच

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचे नाव इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. राजकुमार रावने आतापर्यंत ‘स्त्री’, ‘शादी में जरूर आना’, ‘बधाई दो’ सारखे हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये हे स्थान मिळवले आहे. आज (31 ऑगस्ट ) अभिनेता राजकुमार रावचा वाढदिवस. जाणूनन घेऊया त्याच्या आयुष्यातील एक रंजक किस्सा. 

राजकुमार राव ( rajkumar rao) आज भलेही करोडोंचे मालक असतील, पण एक काळ असा होता की त्यांच्या खात्यात फक्त 18 रुपये होते. इतकेच नाही तर जगण्यासाठी अभिनेत्याला मित्रांकडून पैसे उसने मागावे लागले.

एका मुलाखतीदरम्यान, राजकुमार रावने त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांची आठवण करून देणारे काही किस्से शेअर केले. अभिनेत्याने सांगितले की, जेव्हा तो मुंबईत आला तेव्हा तो खूप लहान ठिकाणी राहत असे. अभिनेत्याने सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा पैसा पूर्णपणे संपत असे. एकदा माझ्या मोबाईलवर मेसेज आला की माझ्या खात्यात 18 रुपये शिल्लक आहेत आणि माझ्या मित्राकडे 23 रुपये आहेत.

त्याने पुढे सांगितले की FTII हा एक मोठा समुदाय आहे. आम्ही पैसे उधार घ्यायचो. इतकेच नाही तर अनेकवेळा तो मित्रांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत जेवण वाटून कामही चालवत असे. एका प्रकारचा टी-शर्ट खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, असेही या अभिनेत्याने सांगितले.

या वर्षी नुकतेच त्याचे लग्न झाले आहे. त्याने पत्रलेखासोबत लग्न करून त्यांच्या सुखी संसाराला सुरूवात केली. लग्नाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते. त्यांची जोडी सगळ्याना खूप आवडली. मागील अनेक वर्षापासून ते दोघेही रीलेशनमध्ये आहेत. त्या दोघांच्या लग्नाची बॉलिवूडमध्ये अनेक दिवसापासून चर्चा चालू होती. राजकुमारने अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. (Rajkummar Rao, who owns crores today, once made a day for 18 rupees)

अधिक वाचा- 
तारीख ठरली! ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; मेहंदीचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली…
रक्षाबंधनाच्या दिवशी सुशांत सिंगच्या आठवणीत श्वेता सिंग झाली भावूक; म्हणाली, ‘तुझा आवाज…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा