Friday, September 20, 2024
Home मराठी ‘माझ्या वाढदिवसाला येशील का?’, चाहत्याला उत्तर देत सई ताम्हणकर म्हणाली, ‘वरण भात आणि…’

‘माझ्या वाढदिवसाला येशील का?’, चाहत्याला उत्तर देत सई ताम्हणकर म्हणाली, ‘वरण भात आणि…’

वाढदिवस म्हटला की, प्रत्येक जण तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात. प्रत्येक व्यक्तीचा जन्म दिवस हा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. राजकीय नेते मंडळी असो वा इतर कोणी यांच्या अनेकदा अभिनेत्रींना बोलवले जाते. अनेक वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अनेकदा चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांना बोलावतात. प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरचा देखील मोठा चाहता वर्ग आहे. एका चाहत्याने सईला वाढदिवसाला बोलावले आहे. या प्रश्नाचे उत्तर सईने भन्नाट दिले आहे.

सई (Sai Tamhankar ) सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो काही वेळातच प्रचंड व्हायरल होतात. सईच्या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात. सईचे लाखो चाहते आहेत. सई तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांचे लक्ष वेधूम घेत असते. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सई सोशल मीडियावर देखील काही ना काही पोस्ट करते. यादरम्यान सईने नुकतेच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेते होते.

यावेळा सईच्या एका चाहत्याने तिच्याकडे एक मागणी केली आहे. त्याने सईला विचारले की, “प्लीज, माझ्या वाढदिवसाला येशील का?” चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर सईने दिले आहे. या उत्तराची सर्वंत्र चर्चा रंगली आहे. यावेळी उत्तर देताना सई म्हणाली की, “बटाट्याच्या काचऱ्या, वरण भात आणि कुरडई प्लेट ठेवा मी आलेच.” सईने दिलेले हे उत्तर ऐकून चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

सई ताम्हणकर विषयी बोलायचं झाले तर, सईने लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’ या सिनेमात कृती सेननच्या मैत्रिणीची शमाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत तिने प्रचंड मेहनत करून तिची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. तिने ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘तू हि रे’ या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (Sai Tamhankar answered the question of the fans)

अधिक वाचा-
कानात झुमका अन् डोळ्यावर गॉगल; देखण्या अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहाच
आज कोट्यवधींचा मालक असणाऱ्या राजकुमार रावने एकेकाळी काढलेत 18 रुपयात दिवस; एकदा वाचाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा