Monday, June 23, 2025
Home अन्य गाणं वाजवा रे! ‘डान्स दीवाने ३’च्या जजने लुंगी घालून केला जबरदस्त डान्स, नोरा फतेहीने देखील लावले ठुमके

गाणं वाजवा रे! ‘डान्स दीवाने ३’च्या जजने लुंगी घालून केला जबरदस्त डान्स, नोरा फतेहीने देखील लावले ठुमके

सध्या कलर्स वाहिनीवरील ‘डान्स दीवाने ३’ हा रियॅलिटी शो खूपच चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक, त्यांचे डान्स तसेच या शोमधील जज या सर्वांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. प्रत्येकाचा वेगळा अंदाज आणि डान्स बघून या शोचे दर्शक वाढत आहेत. त्यामुळे हा शो सध्या सर्वत्र प्रसिद्ध आहे. या सुपरहिट शोचे सूत्र संचालक कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया करत आहेत. त्यामुळे या शोची रंगत आणखीनच वाढताना दिसत आहे. त्यामुळे या शोमध्ये डान्स सोबत विनोदाचा तडका देखील बघायला मिळतो.

‘डान्स दीवाने ३’ या शोमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये या शोमधील अमन नावाच्या एका छोट्या स्पर्धकाने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘लुंगी डान्स’ या गाण्यावर डान्स केला आहे. त्याचा हा जबरदस्त डान्स सगळ्या दर्शकांना आणि जजला देखील आवडला आहे.

त्याचा डान्स संपल्यावर स्टेजवर भारती आणि हर्ष येतात. ते अमनच्या डान्सचे कौतुक करतच असतात, तेवढ्यात जज म्हणतात, ‘गाणं वाजवा रे!’ गाणे लागल्यावर सगळे जज म्हणजेच नोरा फतेही, माधुरी दीक्षित, तुषार कालिया, पुनित पाठक हे सगळे स्टेजवर येतात आणि सगळे लुंगी घालून जबरदस्त डान्स करतात.

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून या शोमधील नोरा फतेही हिच्या डान्समुळे सगळे स्पर्धक खूप खुश आहेत. या गाण्यात देखील तिने स्टेजवर जबरदस्त डान्स केलेला दिसत आहे.

यापूर्वीही अशा अनेक कार्यक्रमांमध्ये स्वत: जज स्टेजवर येऊन थिरकताना दिसले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘नॅशनल क्रश’ बनली शेतकरी! लांब सैल शर्ट अन् कंबरेला गमछा बांधून रश्मिकाने केली नांगरणी

-व्हिडिओ: जेव्हा अमिताभ बच्चन यांनी विराट कोहलीच्या फ्लाईंग किसबद्दल अनुष्काची केली थट्टा, ‘अशी’ होती अनुष्काची प्रतिक्रिया

-एक अभिनेता जोमात, तर दुसरा कोमात! वरुण धवनने मारली झोपलेल्या वरुण शर्माच्या अंगावर उडी, पाहा मजेशीर व्हिडिओ

हे देखील वाचा