कोरोना महामारीमुळे सर्वत्र भयाण वातावरण झाले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही नागरिक ऐकत नसल्याने आता लॉकडाऊनची घोषणा देखील करण्यात आली आहे. अनेक कलाकार देखील व्हिडिओ मधून नागरिकांना घरी राहण्याचे संदेश देत आहे.
अशातच ‘बिग बॉस १४’ फेम अभिनेत्री राखी सावंत हिने हटके अंदाजात नागरिकांना घरी राहण्याचा आणि स्वतःची काळजी घेण्याचा संदेश दिला आहे. नुकताच राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की, राखी सावंतने पीपीई किट घातले आहे. मास्क आणि ग्लोव्हज देखील घातले आहेत. या व्हिडिओमध्ये ती नागरिकांना काळजी घेण्यास सांगत आहे.
राखी सावंतने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, “मित्रांनो तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची देखील काळजी घ्या. कुठेही जायचं असेल, तर पीपीई किट घालून जा. देवाला प्रार्थना करा. शेवटी तोच आपल्याला वाचविणार आहे. त्यानेच आपल्याला जन्म दिला आहे, आणि तोच आपला शेवट देखील करणार आहे. देवापेक्षा मोठा डॉक्टर कोणीच नाहीये. डॉक्टर आहेच पण देव सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून त्याने डॉक्टरांना पाठवले आहे.”
राखी सावंतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्येक नागरिकाने अशी काळजी घेतली पाहिजे, असे ती सांगत आहे. अभिनेत्री राखी सावंत या आधी ‘बिग बॉस १४’ मध्ये दिसली होती. या शोमधील तिची मस्ती आणि अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘नॅशनल क्रश’ बनली शेतकरी! लांब सैल शर्ट अन् कंबरेला गमछा बांधून रश्मिकाने केली नांगरणी