भारतावर ब्रिटीशांची सत्ता होती आणि भारतातील प्रत्यके लोक त्यांची गुलामगीरी करत होते. अनेक शूर वीरींनी आपले प्राण पणाला लावून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील जनतेला स्वत:च्या पायावर उभा करणारे आणि त्यांचे हक्क मिळवून देण्याच काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. त्यांनी भारताच्या संविधानासारखं मोठं दिव्य पार पाडणारे; दलितांवरील अन्यायाला वाचा फोडणारे, आपल्या लेखणीतून सगळ्यांना एकत्र आणणारे, शिका,संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश दिला. त्यांच्या विषयी सांगायतचं झाल तर शब्द कमी पडतील. आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘महापरिनिर्वाण’ (Mahaparinirvana) असं या चित्रपटाचं नाव असून त्यात लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा बाबासाहेब आंबेडकरांवर (Dr Babasaheb Ambedkar) आधारित नसून त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाला आपल्या कॅमेरात कैद करणाऱ्या एका व्यक्तीवर आधारित आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. या चित्रपटाबद्दल प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकने एक पोस्ट शेअर केली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता प्रसाद ओक यांनी लिहिले की, “‘महापरिनिर्वाण’ वंदनीय बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन आज मुहूर्त संपन्न झाला… उद्यापासून चित्रीकरण सुरु…आपल्या शुभेच्छा आणि प्रेम पाठीशी असू द्या…” अशी पोेस्ट करत त्यांनी प्रेक्षकांना विनंती केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला जात आहे. या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “महामानवाची गाथा आहे सर बॉक्स ऑफिस कलेक्शन नक्की रेकॉर्डब्रेक होइल .” दुसऱ्याने लिहिले की, “सिनेमाच नाव महापरिनिर्वाण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.” तर अनेकांनी ‘जय भीम’ म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. ( Prasad Oak will appear in Mahaparinirvana movie based on Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Parinirvana day)
अधिक वाचा-
–शाहरुख खानच्या ‘जवान’वर अभिनेत्री भूमी पेडणेकर फिदा; म्हणाली, ‘हा माणूस…’
–सिनेइंडस्ट्रीला आणखी एक धक्का, रितेश देशमुखच्या सिनेमाचे निर्माते मुकेश उदेशी यांचं निधन