Thursday, April 30, 2026
Home बॉलीवूड वडील सैफ अली खानसोबत शेतात घाम गाळताना दिसला ‘छोटा नवाब’, ‘या’ दिनानिमित्त करीनाची खास पोस्ट

वडील सैफ अली खानसोबत शेतात घाम गाळताना दिसला ‘छोटा नवाब’, ‘या’ दिनानिमित्त करीनाची खास पोस्ट

बॉलिवूडची ‘बेबो’ करीना कपूर खान, सोशल मीडियावर आपल्या भावनांपासून ते कुटुंबाच्या फोटोपर्यंत सर्व काही शेअर करत राहते. या काळात करीना मातृत्वाचा आनंद घेत आहे. आपल्या दोन मुलांसोबत ती पती सैफ अली खानचीही खूप काळजी घेत आहे. घर सांभाळून, ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकताच अभिनेत्रीने सैफ अली आणि त्यांचा लाडका मुलगा तैमूरचा फोटो शेअर केला आहे. आता हा फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.

करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सैफ अली खान हातात फावडे घेऊन शेतात काम करताना दिसत आहे, तर त्याचा मुलगा तैमूर अली खानही हातात एक खूर घेऊन खोदण्यात व्यस्त आहे. दुसर्‍या फोटोमध्ये तैमूर अली खान एका झाडावर बसलेला दिसत आहे. या दोन्ही फोटोंमध्ये तो खूपच गोंडस दिसत आहे.

या फोटोंसह कॅप्शनमध्ये करीनाने लिहिले की, “अधिक झाडे लावा, जागतिक पृथ्वी दिनाच्या दिवशी झाडे वाचवा.” आता चाहते या पोस्टवर कमेंट करून आपले प्रेम व्यक्त करत आहेत. एकाने लिहिले, “गुड लिटल नवाब,” तर दुसऱ्याने लिहिले, “मोठ्या लोकांना जगाची काळजी आहे हे बघून चांगले वाटले. हे एक चांगले उदाहरण आहे, धन्यवाद.”

वास्तविक, २२ एप्रिल रोजी ‘जागतिक पृथ्वी दिना’च्या निमित्ताने करीना कपूरने पर्यावरण संरक्षणाविषयी भाष्य केले. यासाठी सैफ आणि तैमूरच्या या फोटोंपेक्षा चांगले आणखी काय असू शकते.

काही दिवसांपूर्वीच करीना कपूरने तिच्या दुसर्‍या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये मोठा भाऊ तैमूर अली खान आणि सैफ अली खान आपल्या लहान मुलासोबत दिसले. मात्र, अद्याप करीनाने तिच्या छोट्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाही.

याव्यतिरिक्त कामाबद्दल बोलायचे झाले, तर बेबो आमिर खानसोबत ‘लालसिंह चढ्ढा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री हिना खानने घेतला मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत स्वत: दिली माहिती

-‘ऑल टाईम फेव्हरेट’, अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या ऍनिमल प्रिंटेड ड्रेसमधील फोटोवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

-‘पंगा क्वीन’ कंगना रणौतने तापसी पन्नूवर केलेल्या कमेंटवर भडकले चाहते, म्हणाले…

हे देखील वाचा