Sunday, August 10, 2025
Home अन्य छोट्या आर्याने गायलेले ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर’ गाणं, आजंही होतंय इंटरनेटवर व्हायरल

छोट्या आर्याने गायलेले ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर’ गाणं, आजंही होतंय इंटरनेटवर व्हायरल

गेल्या काही वर्षात अनेक रियालिटी कार्यक्रम जनमानसात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. या कार्यक्रमांमुळे यातील कलाकारांच्या कलेला मोठया प्रमाणात वाव मिळाला आहे. अगदी छोट्या छोटया गावातूनसुद्धा स्पर्धक  या कार्यक्रमात सहभागी झालेले आपण आजवर बघितले आहेत. अशाच काही कार्यक्रमांपैकी प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून राहिलेला कार्यक्रम म्हणजेच सा रे ग म प  लिटील चॅम्प मराठी हा होय. यातील लहान मुलांमधील कमालीची कला आणि काहीतरी करून दाखवण्याची धडपड प्रत्येकालाच काहीतरी शिकवून गेली आहे.

सा रे ग म प लिटील चॅम्प या कार्यक्रमाची सुरवात १८ सप्टेंबर २००६ साली झाली होती. आजवर पल्ल्लवी जोशी यांच्या गोड आवाजाने  सूत्रसंचालनात एक वेगळीच मज्जा बघायला मिळाली आहे. कार्यक्रमात सूत्रसंचालनाची भूमिका आजवर त्यांनी कमालीची करून दाखवली आहे. त्यातच तोडीस तोड परीक्षक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी मुलांना कायमच योग्य मार्गदर्शन करत त्यांच्यातल्या कलेला मोठया प्रमाणात वाव दिला आहे.

नुकताच छोट्या आर्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. सा रे ग म प मध्ये स्पर्धक असताना छोटी आर्या  “कशी झोकात चालली कोळ्याची पोर” हे गाणं  सादर करताना दिसत आहे. या गाण्याची एक झलक या व्हिडिओमधून दिसत आहे .ज्यात ती नेहमीसारखीच कमाल गात आहे.

या व्हिडिओचा उद्देश असा की,  सा रे ग म प लिटील चॅम्प परत एकदा सगळ्यांच्या भेटीला येत आहे. एक काळ असा होता की, मुग्धा वैशंपायम, आर्या अंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राव, कार्तिकी गायकवाड या पंचरत्नांनी सा रे ग म प चे व्यासपीठ खूप गाजवले होते आणि आता हेच एकेवेळचे स्पर्धक येत आहेत, आपल्या  भेटीला ते ही परीक्षकाच्या भूमिकेतून.

सा रे ग म प च्या प्रवासानंतर आर्या  आंबेकर हिने अनेक मालिकांचे शीर्षकगीत, तसेच चित्रपटात गाणे गात आपल्या आवाजाची  जादू प्रेक्षकांवर केली आहे.

हे देखील वाचा