कोरोनाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत केले आहे. देशातील कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नाहीये. देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाची नवीन प्रकरणे सातत्याने समोर येतच आहेत. रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे २,६१,५०० नवीन रुग्ण आढळले आहेत. सोबतच १,५०१ संक्रमित रुग्ण मरण पावले आहेत.
सध्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. तर १ मे पासून १८ वयवर्षांवरील सर्वांसाठी लस उपलब्ध होणार आहे. अशा परिस्थितीत, महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या लशींचा तुटवडा भासत आहे. लवकरात लवकर आपल्याला लस मिळावी या आशेने, लसीकरण केंद्राबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. भर उन्हाळ्यात नागरिकांना या रांगा लावाव्या लागत आहेत. मात्र असे करूनही लस मिळेल की नाही, याची शाश्वती नाही.
लसीकरण केंद्राबाहेरच्या या रांगा पाहून अभिनेता हेमंत ढोमे सरकारवर खूप संतापला आहे. त्याने ट्विटरवर ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये अभिनेत्याने लिहिले आहे, “सर्व नियम पाळणारा, सरकारला प्रामाणिकपणे टॅक्स भरणारा, या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणूस आता आरोग्यसुविधांसाठी (जगण्यासाठी) रांगेत उभा आहे! उन्हा-तान्हाचा, कुठल्याही सावली शिवाय…खूप वय असलेला, थकलेला! आत्ता नेस्को (गोरेगाव मुंबई) बाहेर लांब रांग! कमीत कमी १ किमी तरी, हजारो लोक आहेत! गेटवर चेंगराचेंगरी, social distancing चा पत्ता नाही! एवढे करून लस मिळेल की नाही हे सुद्धा माहीत नाही. सारी व्यवस्था कोलमडलीय. माणसाला माणसासारखे तरी वागवा. महासत्ता होणार म्हणे…महाथट्टा नक्कीच झालीय.”
सर्व नियम पाळणारा… सरकार ला प्रामाणिक पणे टॅक्स भरणारा… या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणुस आत्ता आरोग्य सुविधांसाठी (जगण्यआसाठी) रांगेत उभा आहे! उन्हा-तान्हाचा कुठल्याही सावली शिवाय… खूप वय असलेला, थकलेला! आत्ता नेस्को (गोरेगाव, मुंबई) बाहेर लांब रांग! pic.twitter.com/P08ELQOMH4
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) April 24, 2021
कमीत कमी १ किमी तरी… हजारो लोक आहेत! गेटवर चेंगरा चेंगरी… social distancing चा पत्ता नाही! एवढं करून #vaccine मिळेल की नाही हे सुद्धा माहित नाही… सारी व्यवस्था कोलमडलीय… माणसाला माणसासारखं तरी वागवा… महासत्ता होणार म्हणे… महाथट्टा नक्कीच झालीय…
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) April 24, 2021
असे लिहत त्याने मुंबईच्या लसीकरण केंद्राबाहेरील रांगेचे काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यात खूप गर्दी दिसत आहे. आता हेमंत ढोमेची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
याशिवाय, दक्षिणेकडील महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली तसेच कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना सावधगिरी बाळगणे आणि काळजी घेणे खूप आवश्यक आहे.