Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

सव्वा लाख लोकांच्या गर्दीत हरवला उर्वशीचा आयफोन; ढसाढसा रडत थेट केली पोलिसात तक्रार, म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री आणि सेलिब्रेटी उर्वशी रौतेलाचा आयफोन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हरवल्याची माहिती समोर आली आहे. उर्वशी ही भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेली होती. सामन्यादरम्यान तिने काही व्हिडिओ शूट केले होते, त्यानंतर तिचा मोबाईल हरवल्याचे तिने सांगितले आहे.

उर्वशीने (Urvashi Rautela ) याबाबत ट्विट करत म्हटले आहे की, “माझा 24 कॅरेट गोल्ड आयफोन नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथून हरवला आहे. कृपया जर कोणाला माझा फोन सापडला असेल तर कृपया मला कळवा. फोनमध्ये माझ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत.” उर्वशीचा आयफोन हरवल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तिला फोन काळजीपूर्वक सांभाळण्याचा सल्ला दिला आहे, तर काहींनी तिला फोन शोधण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी स्टेडियम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. उर्वशी रौतेलाला क्रिकेटचा खूप शौक आहे. ती यापूर्वीही अनेकदा क्रिकेट सामन्यांना उपस्थित राहिली आहे. यावेळीही तिने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. उर्वशीचं क्रिकेटप्रेम हे सर्वांना माहिती आहे. रविवारी (14 ऑक्टोबर) आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 सामना पार पडला. भारत-पाकिस्तान हा सामना पाहण्याठी उर्वशी गेली होती.

अभिनेत्री आणि सेलिब्रेटी उर्वशी रौतेलाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झालं तर, उर्वशी रौतेला काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता एल्विश यादवसोबत एका म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. त्यांच्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. लवकरच ही अभिनेत्री काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. ज्याची त्याचे चाहते खूप वाट पाहत आहेत. (Urvashi Rautela iPhone lost at Narendra Modi Stadium in Ahmedabad)

आधिक वाचा-
‘फुकरे 3’ चित्रपटाचा जलवा कायम ; कमाईचा आकडा ऐकून उंचावतील भुवया, एकदा वाचाच
प्रेक्षकांचा ‘हा’ लाडका कलाकार बिग बॉसमध्ये करणार एंट्री; एका जोकमुळे थेट खावी लागलेली जेलची हवा

हे देखील वाचा