टेलिव्हिजनवरील ‘तुझसे है राबता’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांना खूपच आवडते. या मालिकेतील रीम शेखच्या पात्राला देखील दर्शक भरभरून प्रेम देत असतात. रीम नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता देखील तिने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. पण यावेळेस तिला कौतुक नाही तर नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
रीम शेखने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा बिकिनी टॉप घातला आहे. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
खरंतर भारतामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता, ‘तुझसे हैं राबता’ या मालिकेची शूटिंग गोव्याला केली जात आहे. या मालिकेची संपूर्ण टीम गोव्याला शूट करत आहेत. अशातच शूटिंगमधून मोकळा वेळ मिळाल्यानंतर रीमने बिकिनी घालून फोटोशूट केले आहे. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिचे हे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना आवडेल नाहीत. त्यामुळे तिला खूप वाईट पद्धतीने ट्रोल केले जात आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, “रीम तू रमजानच्या पवित्र महिन्यात बिकिनी घालून फोटो शेअर केले आहेत. अल्ला रीमला कधीच माफ करू नको.”
दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “कमीत कमी रमजानच्या महिन्यात तरी असं काही करू नको.” अजून असे अनेक युजर्स आहेत. ज्यांनी रीमने रमजानच्या महिन्यात असे फोटो शेअर केल्याने तिला ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले आहे की, “रोजेच्या महिन्यात तरी अस करू नको, रमजान सणाचा तरी विचार कर.”
आणखी एका युजरने लिहिले आहे की, “लाज वाटू दे जरा, रोजे चालू आहेत. एक मुस्लिम असूनही तू हे असं करत आहेस. तुमच्या सारख्या लोकांना या जगात आणल्यामुळे आज अल्लाला लाज वाटतं असेल.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘इंडियन आयडल १२’ शोमध्ये वडिलांविना दिसणार सायली कांबळे, कारण सांगताच झाले सर्वजण भावुक