Monday, August 11, 2025
Home बॉलीवूड श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर झाली मुंबई विमानतळावर स्पॉट, हातावरील टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष

श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर झाली मुंबई विमानतळावर स्पॉट, हातावरील टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष

बॉलिवूडची दिवंगत अभिनेेत्री श्रीदेवीने आपल्या अभिनयाने संपूर्ण जगभरात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. आपल्या आईप्रमाणेच श्रीदेवीच्या मुलीही सध्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय आहेत. तिची धाकटी मुलगी खुशी कपूर दोन महिन्यानंतर यूएसहून भारतात परतली आहे. तिला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी तिच्यासोबत संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आणि बहीण अंशुला कपूरही दिसली. परंतु यावेळी खुशी कपूरच्या टॅटूने सर्वांचेे लक्ष वेधले आहे. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे खुशीच्या टॅटूमध्ये
यावेळी विमानतळावर तिन्ही बहिणी खुशी कपूर, शनाया कपूर आणि बहीण अंशुला कपूर कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सर्व गोष्टींचे पालन करताना दिसल्या. तिघींनीही फेस मास्क आणि फेस शील्ड घातले होते. यादरम्यान खुशीचा लूक खूपच कॅज्युअल होता. तरीही सर्वांचे लक्ष वेधले ते खुशीच्या हाताने, कारण खुशीच्या हातावर एक टॅटू होता. त्यावर ‘The Rest Will Work Itself Out,’ असे लिहिले आहे. याचा अर्थ ‘बाकी काम आपोआपच पूर्ण होईल,‘ असा आहे.

चाहते करतायत प्रशंसा
या व्हिडिओत स्पष्टपणे खुशीचा टॅटू दिसत आहे. या टॅटूवरून खुशीचा कर्मावर विश्वास असल्याचे दिसते. तिचा हा टॅटू पाहून चाहतेही प्रशंसा करत आहेत.

जान्हवी कपूर गेली होती भेटायला
दुसरीकडे नुकतेेच जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कारण जान्हवी ‘रूही’ चित्रपट रिलीझ झाल्यानंतर थेट आपल्या बहिणीला भेटण्यासाठी यूएसला गेली होती. खुशी मार्चमध्ये आपली बहीण जान्हवीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी यूएसला गेली होती, जिथे ती चित्रपटाचा अभ्यास करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे

-याला म्हणतात गाण्याची जादू! हिमेश रेशमियाच्या ‘या’ गाण्यामुळे सापडला होता खरा चोर, दोन रात्रीत उडवले होते एक लाख रुपये

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा