Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड फराह खानवर कोसळला दुःखाचा डोंगर; आईने घेतला वयाच्या 79 व्या वर्षी शेवटचा श्वास

फराह खानवर कोसळला दुःखाचा डोंगर; आईने घेतला वयाच्या 79 व्या वर्षी शेवटचा श्वास

बॉलिवूडची सुप्रसिद्ध कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) हिच्या आई मेनका इराणी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांची दीर्घकाळच्या आजारपणाशी झुंज अपयशी ठरली. मेनका इराणी या माजी बाल कलाकार डेझी इराणी आणि हनी इराणी यांच्या बहीण होत्या. अत्यंत कठीण परिस्थितीतून येत त्यांच्या दोन्ही मुलांनी, फराह आणि साजिद यांनी बॉलीवूड मध्ये आपलं नाव कमावलं.

काही दिवसांपूर्वी फराहने तिच्या इन्स्टाग्रामवर एका सुंदर फोटोसहीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. फराह म्हणते, “आपण सर्व आपल्या आईला गृहीत धरतो. विशेषतः मी ! गेल्या महिन्यात मी माझी आई, मेनकावर किती प्रेम करते याचा मला खुलासा झाला आहे.. मी आजवर पाहिलेली सर्वात मजबूत, धाडसी व्यक्ती आहे ती. माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करण्यासाठी तुझी लवकर बरे होण्याची वाट बघते आहे… लव्ह यू !”

मेनका गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होत्या आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. २६ जुलै रोजी रात्री ३ वाजेच्या दरम्यान त्यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

या ‘अभिनेत्रीने काही वर्षापूर्वी सोडली टीव्ही इंडस्ट्री, आज आहे करोडोंच्या घराची मालकीण
फॅशन इन्फ्ल्यूएन्सर सूफी मोतीवाला उर्फी जावेदच्या निशाण्यावर, अश्लील संदेश पाठवल्याबद्दल फटकारले

हे देखील वाचा