Wednesday, February 18, 2026
Home मराठी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासात एक वाईट सदस्य आहात! जान्हवीवर रितेशचा संताप अनावर…

तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासात एक वाईट सदस्य आहात! जान्हवीवर रितेशचा संताप अनावर…

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन होऊन आता महिना होत आला आहे. चौथ्या आठवड्यात भाऊचा धक्का घेऊन रितेश देशमुख परत आला आहे. एक नवा प्रोमो रिलीज झाला असून त्यात दिसत आहे की यावेळी रितेशने जान्हवीला फैलावर घेतलं आहे. रितेश यावेळी खरंच सर्वांना भाऊचा धक्का देताना दिसणार आहे. प्रोमो मध्ये देखील रितेश जान्हवीला सरळ बाहेरचा रस्ता दाखवताना दिसतोय. 

या नव्या प्रोमो मध्ये रितेश जास्तच रागावलेला दिसत आहे. हा राग यावेळी विशेष करून जान्हवीवर आहे. जान्हवीला सुनावत रितेश म्हणतोय, जान्हवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासात एक वाईट सदस्य आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनल जावं याची एक लिमिट असते. शब्दकोशात ओव्हर हा शब्द विशेष तुमच्यासाठी आहे. भाउच्या धक्क्यावर आता मी एक बंदोबस्त करणार आहे. शो फक्त तीन महिन्यांचा आहे. या घरात सगळे सदस्य करियर बनवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात ? तुमचा ओव्हर कॉन्फिडेन्स तुम्हाला नक्कीच नडणार आहे”

रितेश पुढे म्हणाला, तुम्ही नाटकी आहात, तुम्ही ढोंगी आहात. लोकांना सगळं दिसतंय. तुम्ही मेलोड्रामा करता सगळे कॅमेरे स्वतः कडे वळवण्याचा प्रयत्न करता. पंढरीनाथ यांची मागितलेली माफी तरी मनापासून होती का ? एवढं असूनही त्यांनी तुम्हाला मोठ्या मनाने माफ केलंय. जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचा सुद्धा अपमान करताय. कलाकार छोटा असो किंवा मोठा. तो कलाकारच असतो. खोटं वागण्याला एक लिमिट असते. तुम्ही जे करता ते नाटकच आहे. 

रितेश शेवटी म्हणतो, या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे. हे सगळं फुटेज आणि क्रेडीट साठी तुम्ही करताय. करियर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते. लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे. आज नंतर माझ्या भाउच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो.  आणि असं म्हणून रितेश शेवटी दरवाजा उघडा रे असं सांगतो, आणि जान्हवी मग रडत बाहेर जाते. जान्हवी खरंच घराबाहेर पडणार का ? हे बघण्यासारखे असेल.    

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

माझ्या विरोधात षडयंत्र सुरू आहे! कंगनाने इंडस्ट्रीवर लावले गंभीर आरोप…

हे देखील वाचा