ऐश्वर्या राय बच्चन ही अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. ऐश्वर्या आपली मुलगी आराध्या बच्चन बद्दल नेहमीच जागरूक असते कारण ती एक समर्पित आई आहे.
२० एप्रिल २००७ रोजी ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचा विवाह झाला. यानंतर १६ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांनी त्यांची मुलगी आराध्याचे स्वागत केले. ऐश्वर्या जिथे जाते तिथे तिची मुलगी आराध्याला सोबत घेऊन जाते. आराध्या अनेकदा तिच्या आईसोबत शूटिंग, इव्हेंट्स आणि हॉलिडेला जाताना दिसते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या रायने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, आराध्याच्या जन्मानंतर तिचे प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलले आहेत.
ऐश्वर्या रायने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी १८ वर्षांची असल्यापासून अनेक जबाबदाऱ्या पेलत आहे. माझा दिवस पहाटे ५.३० वाजता सुरू होतो. मला आठवते तेव्हापासून हे असेच आहे. अर्थात आराध्यानंतर माझे प्राधान्यक्रम हेच आहेत.माझ्यासाठी आराध्या आधी येते, बाकी सर्व नंतर.
ऐश्वर्या रायने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती आणि अभिषेक आराध्याला ‘सामान्य’ जीवन देण्यासाठी प्रयत्न करतात. ऐश्वर्या म्हणाली होती की, “आराध्या घरी माझ्या गाण्यांवर, कधी तिच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या गाण्यांवर नाचत राहते. हे घर इतरांसारखे सामान्य आहे. आराध्याच्या आजूबाजूचे वातावरण सर्वांना माहीत आहे. ते सामान्य ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
आराध्याबद्दल ऐश्वर्या राय म्हणाली, “मुलीसारखं होणं खूप सोपं आहे. माझ्या आयुष्यात आराध्यासारखी गोड मुलगी असल्यामुळे ही एन्जेल माझ्या आतल्या लहान मुलाला जिवंत ठेवते. माझ्या आयुष्यात आराध्या नावाच्या या आशीर्वादासाठी मी नेहमीच देवाचे आभार मानते. मी कृतज्ञ असेल.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
रोहित शेट्टी ‘सिंघम अगेन’चा क्लायमॅक्स होणार मोठा बदल? सेटवरील लोक दिसले राक्षसांच्या रूपात