कालच्या दिवशी बिग बॉसच्या घरात गोंधळ उडाला. आर्याने निक्की सोबत झालेल्या भांडणात तिच्या थेट कानाखाली मारली, यानंतर मात्र निक्कीने खूप आरडओरड केली. यावर बिग बॉस ने देखील तीव्र प्रतिक्रिया देत आर्याला जेलची शिक्षा दिली. आज भाउच्या धक्क्यावर रितेश देशमुख आर्याला अजून झापणार आहे. आर्याचं घरातलं भविष्य यावर ठरवलं जाणार आहे. यादरम्यान निक्की तांबोळी हिची आई प्रतिमा तांबोळी यांनी या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रमिला तांबोळी महणाल्या, “काल जे बिग बॉसच्या घरात पडलं ते निंदनीय आहे. निक्कीवर आर्याने हल्ला केला. ती फिजीकल झाली बिग बॉसने याची गंभीर दखल घ्यायला हवी. आम्ही इथे राहून काही करु शकत नाही. पण आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटते बिग बॉसच्या घरात सतत तिच्यासोबत असं घडतंय. मागच्या आठवडयात तो संग्राम आला त्याने मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या आणि निक्की बेसावध असताना तिला अचानक पाण्यात इकललं हे काय आहे? तिला काही त्रास झाला असता, असे अचानक ढकलल्यावर नाकातोंडात पाणी गेलं असतं मग कुणी त्यावर उत्तर दिलं असतं ?
प्रतिमा तांबोळी पुढे म्हणाल्या, नशीब तिला काही झालं नाही ही फार चांगली गोष्ट आहे पण त्याने हे योग्य केलं नाही. तुम्ही सगळे एवढा बाऊ करता की अरबाज असं करतो तसं करतो, काय केलं त्याने? अरबाज कितीही आक्रमक असला तरी त्याच्यामुळे कोणालाही इजा झालेली नाही. पण निक्कीला त्रास झालाय ,मागे आर्या निक्कीच्या हाताला चावली होती. तिचा हात काळा निळा पडला होता त्याचीही बिग बॉसने दखल घेतली नव्हती.कुठेही वीकेंडला दाखवत नाही हे असं कसं ?
त्या पुढे असंही म्हणाल्या की, तुम्ही नको त्या गोष्टी उकरुन काढता आणि दाखवता. पण निक्कीसोबत घरात सतत असं होतंय. काल आर्याचं टास्क खेळण्याऐवजी निक्कीला कसा त्रास देता येईल, कसं आडवता येईल याकडेच लक्ष होतं. अंकिता, आर्या, वर्षा ताई यांनी हे ठरवूनच केलं. बिग बॉसनेही असेच ग्रुप बनवले जिथे त्यांच्यासमोर त्यांनी निक्कीला ठेवलं. बाकीचे काही यखेळतच नव्हते जर बाकीच्यांना निक्कीला खेळूच द्यायचं नव्हतं तर बिग बॉसने सांगायचं होतं की निक्की तू खेळू नको.
आर्याने जेव्हा दार लावून घेतलं तेव्हा बिग बॉसने एकदाही म्हटलं नाही की तू दार लावू शकत नाही. त्याचाच परिणाम हा झाला की पुढे तिने निक्कीला मारलं. बिग बॉसने याची गंभीर दखल घ्यावी आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही. आमची मुलगी काय तिथे मार खायला गेलीये का? चुकीच आहे हे कृपया बिग बॉस काहीतरी करा, तिला शारीरिक सुरक्षा मिळायला पाहिजे तर आम्ही निश्चिंत होऊन शो बघू शकतो. नाहीतर आम्हाला आईवडिलांना कसं वाटत असेल याचा विचार करा आर्या आता घरात नको, तिला बाहेर काढा
आता यावर प्रेक्षकांच्या अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया येत आहेत. आता हे बघणे रंजक ठरेल की बिग बॉस यावर कशी प्रतिक्रिया देते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
करीना कपूरचे हे क्राईम थ्रीलर चित्रपट बघितले आहेत का ? एका चित्रपटात होती भुताची भूमिका…