Tuesday, September 29, 2026
Home › मराठी › भाऊ-भाऊ बोलून गळा पकडायचा; अंकितावर संतापली निक्की, सुरजला दिला मोलाचा सल्ला…

भाऊ-भाऊ बोलून गळा पकडायचा; अंकितावर संतापली निक्की, सुरजला दिला मोलाचा सल्ला…

बिग बॉस मराठी सिझन ५ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आजूनही या कार्यक्रमात नवनवीन ट्विस्ट येतच आहेत. कालच एलीमिनेशन द्वारे अरबाज पटेल घराबाहेर पडला. आजपासून खेळाचा नववा आठवडा सुरु होतोय. आता एक नवीन खेळ घरात खेळवला जातोय. ज्यामध्ये घरात ज्याला ठाम मते नाहीत त्या सदस्याला टार्गेट केलं जातंय. 

नव्या रिलीज झालेल्या प्रोमोत ज्या दोन सदस्यांना ठाम मते नाहीत अशांना टार्गेट केलं जाताना दिसतंय. असा आदेश बिग बॉसनेच दिला आहे. वर्षा उसगावकर यांनी पंढरीनाथ कांबळे याला टार्गेट केल्यानंतर तो चांगलाच चिडलेला दिसला. पुढे तो म्हणाला मला लोकांपर्यंत जे पोहोचवायचं आहे ते पोचलं आहे. पुढे जेव्हा अंकिताची वेळ आली तेव्हा तिने सुरजचे नाव घेतले. त्याचवेळी सूरजच्या शेजारी उभी असलेली निक्की त्याला म्हणते हि असलीयत आहे. भाऊ भाऊ बोलून गळा पकडायचा. 

बिग बॉस मराठीचा हा सिझन आता लवकरच संपणार आहे. १०० दिवसांचा चालणारा हा सिझन आता ७० दिवसांतच संपणार आहे. याचा खुलासा खुद्द कलर्सच्या वरिष्ठ अधिकारी सुगंधा लोनोकर यांनीच केला आहे.  

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

१०० नव्हे आता ७० दिवसांतच संपतोय बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन; अचानक झालेल्या निर्णयाने सर्वजन हैराण…

हे देखील वाचा