Tuesday, November 11, 2025
Home मराठी १०० नव्हे आता ७० दिवसांतच संपतोय बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन; अचानक झालेल्या निर्णयाने सर्वजन हैराण…

१०० नव्हे आता ७० दिवसांतच संपतोय बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन; अचानक झालेल्या निर्णयाने सर्वजन हैराण…

अगदी सुरु झाला तेव्हापासून बिग बॉस सिझन ५ चर्चेत आहे.  करणे वेगवेगळी असली तरीही बिग बॉसची चर्चा मात्र गेले दोन महिने सतत होत आहे. बिग बॉसचा हा खेळ १०० दिवसांचा असतो हे सर्वांनाच माहिती आहे. आधीचे ४ सिझन सुद्धा १०० दिवसांचेच होते.  मात्र हा पाचवा सिझन आता फक्त ७० दिवसांतच संपवला जाणार आहे हे पक्कं झालय. 

बिग बॉस टीव्ही वर प्रसारित करणारी वाहिनी कलर्स मराठीने यावर आता शिक्कामोर्तब केला आहे.  हा सिझन १०० नव्हे तर ७० दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेतोय. हि बातमी खुद्द कलर्स वाहिनीच्या वरिष्ठ अधिकारी सुगंध लोणीकर यांनी कन्फर्म केली आहे.

माध्यमांशी बोलताना सुगंधा लोणीकर म्हणाल्या; होय, बिग बॉस सिझन ५ प्रेक्षकांचा ७० दिवसांतच निरोप घेतोय. हा निर्णय अचानक घेतलेला आहे. याची कुणालाही कल्पना नव्हती. स्पर्धकांनाही आजच्या एपिसोड मध्ये हि माहिती देण्यात येणार आहे. हा शो इतक्या लवकर संपवण्यामागे एक कारण आहे. लवकरच ते सांगण्यात येईल . 

कालच्या भागात बिग बॉस मध्ये भाऊचा धक्का झाला नाही. अभिनेता रितेश देशमुख लंडन मध्ये आपल्या आगामी हाउसफुल ५ या सिनेमाची शूटिंग करण्यात व्यस्त असल्याने डॉ.  निलेश साबळे यांनी शो मध्ये हजेरी लावत सूत्रसंचालन पार पाडले. काल एलीमिनेषण सुद्धा पार पडले. अरबाज पटेल घराबाहेर गेला.

याबाबत शनिवारी सकाळी पत्रकार परिषद पार पडली होती.  ज्यामध्येच सुगंधा लोणीकर यांनी हि बातमी योग्य असल्याचे सांगितले. येत्या ६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठी आपला फिनाले पार पाडणार आहे. आता उर्वरित सदस्यांपैकी कोण या पर्वाचा विजेता होणार याकडे सर्वच प्रेक्षक नजर लावून बसले आहेत.  

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

पॅरिस मध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत रणबीर – आलीया; कामातून ब्रेक घेत मारला पॅरिसच्या रस्त्यांवर फेरफटका…

 

हे देखील वाचा