Sunday, June 22, 2025
Home मराठी प्रेमाच्या शोधात सिद्धार्थ खिरीड पोहचला कॅनडाला; दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा

प्रेमाच्या शोधात सिद्धार्थ खिरीड पोहचला कॅनडाला; दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा

एकीकडे लगीन सराई चालू असताना दुसरीकडे मराठी मध्ये देखील प्रेमाचे वारे वाहू लागलेले आहेत. अनेक कलाकार एका मागून एक प्रेमाची कबुली देत आहेत अशातच आता फ्रेशर्स, मुलगी झाली हो यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता सिद्धार्थ खिरिड याने देखील आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर ड्रीमी प्रपोजलचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा कोणालाही दाखवला नव्हता. अखेर त्याने गर्लफ्रेंडचा चेहरा सोशल मीडियावर सगळ्यांना दाखवलेला आहे.

सिद्धार्थ त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताना ते काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हापासूनच अनेक लोक त्याची होणारी पत्नी नक्की कोण असेल याचा अंदाज लावत होते. अखेर त्याने फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटो तो तिला अंगठी घालताना दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये ते दोघेही आनंदाने हसताना दिसत आहे. फोटो शेअर करून त्याने “दोन हृदय दोन, देश दोन व्यवसाय, एक कायमस्वरूपी लव स्टोरी” असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या फोटोवर सगळेजण कमेंट्सचा वर्षाव करून त्याला शुभेच्छा देत आहेत. सिद्धार्थची होणारी बायको ही कॅनडाची आहे. त्याचप्रमाणे ती व्यवसायाने एक डॉक्टर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Khirid (@siddharthkhirid)

 

अनेकजण त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. त्याचप्रमाणे रसिका वेंगुर्लेकर तसेच ओम राऊत यांनी देखील कमेंट करून अभिनंदन केलेले आहे. त्याचप्रमाणे त्याच्या अनेक चाहत्यांना देखील आनंद झालेला आहे. आणि सगळेजण त्याच्या या फोटोवर कमेंट करून त्याला शुभेच्छा देत आहेत. सिद्धार्थच्या होणाऱ्या बायकोला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. कारण ती एक अभिनेत्री नाही. तरी देखील कोणत्याही अभिनेत्री पेक्षा ती कमी नाही. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सिद्धार्थने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेले आहे. त्याने फ्रेशर्स, जाडूबाई जोरात, राणी मी होणार या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

सैराट’मधील लंगड्याला मिळाली गर्लफ्रेंड; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार

हे देखील वाचा