Saturday, October 19, 2024
Home भोजपूरी सपना चौधरीच्या डान्सवर लोकांनी केली पैशाची उधळण…पहा सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडिओ!

सपना चौधरीच्या डान्सवर लोकांनी केली पैशाची उधळण…पहा सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडिओ!

हरियाणवी डान्सर, अभिनेत्री सपना चौधरी हिला आजच्या घडीला कुणी ओळखत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. विशेषतः उत्तरेच्या राज्यांमध्ये तर सपनाची फॉलोइंग मोठ्या प्रमाणात आहे, याला कारणही तसंच आहे.

सपना ही केवळ सिनेमात काम करत नाही तर डान्सचे ती उत्तरेच्या राज्यांमध्ये स्टेज शोज मोठ्या प्रमाणात करत असते, त्यामुळे तिचे चाहते आपल्याला सर्वत्र आढळतील. यावर्षी कोरोनाकाळामुळे लॉकडाऊन लागला आणि त्यानंतर अनेक निर्बंधांवर सुरू झालेल्या अनलॉक मुळे तिला सध्या स्टेज शोज करता येत नाहीत. पण म्हणून तिच्या फॅन्स च्या मनोरंजनात कसलीच कमी राहत नाहीये. सपनाचे जुने व्हिडिओज सध्या इतके व्हायरल होत आहेत की यांचे व्ह्यूज पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढत आहेत.

डान्सर अभिनेत्री सपना चौधरी ही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. अलिकडे सपनाचा नागिन डान्सचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत असून तिचा हा डान्स लोकांना खूप आवडत आहे. सपना आपल्याला या व्हिडिओमध्ये हरियाणवी गाण्यावर नगीन डान्स करताना दिसते. ‘मेरा चांद लुका है यारो घुंगट की ओट में’ असे या गाण्याचे बोल आहेत. या संपूर्ण व्हिडिओमध्ये सपना आपल्याला बर्‍याचदा तिचा घुंगट बाजूला सारून प्रेक्षकांच्या नजरेशी खेळताना दिसतेय. गाण्याच्या सुरुवातीलाच सपनाने एक जबरदस्त नागीण डान्स केला, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये बसलेले लोक मोकळ्या हातानी तिच्यावर पैशांचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओ मधील गर्दी पाहून आपल्या लक्षात आलंच असेल की किती मोठ्या प्रमाणात गावागावात सपनाचे चाहते पसरलेले आहेत.

हरियाणवी सिनेमांमध्ये यशस्वी झाल्यानंतर तिने बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली होती. बिगबॉस मध्येदेखील सपना ने तिच्या नावाचा डंका वाजवला होता. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर लगेच तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं. चित्रपट बैरी कंगनामधील तिचा खास आयटम नंबर बर्‍यापैकी लोकप्रिय झाला होता. यानंतर सपना चौधरी हिने एका पंजाबी सिनेमातही एक गाण्यामध्ये खास नृत्य सादर केलं होतं. दोस्ती के साईड इफेक्ट्स या सिनेममधून तिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा