Friday, April 3, 2026
Home कॅलेंडर दुर्दैवी! तब्बल २५० चित्रपटात काम केलेल्या चित्रपटातील सर्वात मोठ्या खलनायकाचा ‘असा’ झाला होता मृत्यू

दुर्दैवी! तब्बल २५० चित्रपटात काम केलेल्या चित्रपटातील सर्वात मोठ्या खलनायकाचा ‘असा’ झाला होता मृत्यू

हिंदी सिनेमांना लोकप्रिय आणि हिट होण्यामागे बऱ्याच लोकांचा हात असतो. अगदी कलाकारापासून ते दिग्दर्शकापर्यंत अनेक लोक चित्रपटाच्या यशाचे मानकरी असतात. ९० च्या दशकात कलाकारांसोबतच खलनायकांवरून देखील सिनेमांची ओळख तयार झाली होती.

मोगॅम्बो, गब्बर सिंग, शाकाल, गेंडास्वामी इतर अनेक चित्रपटातील खलनायकांना हिरो इतकीच किंबहुना हिरोपेक्षा जास्त लोकप्रियता मिळाली. यातलेच एक मुख्य नाव म्हणजे ‘कर्नल चिकारा’. ‘वक्त हमारा हैं’ सिनेमातील मुख्य खलनायक म्हणून रामी रेड्डी यांनी प्रेक्षकांवर आपली वेगळी छाप सोडली. रामी यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमात एक क्रूर आणि भयानक असा खलनायक रंगवला. या लेखातून आपण रामी रेड्डींबद्दल जाणून घेणार आहोत.

१ जानेवारी १९५९ जन्मलेल्या रामी रेड्डी यांचे संपूर्ण नाव गंगासानी रामी रेड्डी होते. आंध्रप्रदेशातील चितूर जिल्ह्यातल्या वाल्मिकीपुरम गावात त्यांचा जन्म झाला. त्यांनी हैद्राबाद विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेत पदवी मिळवली. चित्रपटात येण्यापूर्वी रेड्डी यांनी बरेच वर्ष पत्रकारिता केली. रेड्डी यांनी हिंदी सोबतच तेलगू, कन्नडा, मल्याळम, भोजपुरी भाषेतील असंख्य सिनेमात काम केले.

तेलगू सिनेमातून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या रामी यांनी, ‘प्रतिबंध’ या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘प्रतिबंध’ चित्रपटाची त्यांची ‘अण्णा’ ही भूमिका प्रचंड गाजली. ह्याच भूमिकेने त्यांना हिंदी सिनेमात ओळख मिळून दिली. रामी यांनी त्यांच्या लूक्सचा फायदा उचलत अनेक सिनेमात लोकप्रिय अशा खलनायकी भूमिका रंगवल्या. रामी यांचे दिसणे आणि त्याची बोलण्याची वेगळी स्टाईल यामुळे त्यांनी त्यांची ओळख तयार केली. पडद्यावर नुसत्या त्यांच्या येण्यानेच दहशत निर्माण व्हायची. रामी यांनी सुमारे २५० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.

रामी यांना जेव्हा लिव्हरच्या आजाराने ग्रासले तेव्हा रामी यांचे संपूर्ण जीवन बदलून गेले. या आजारामुळे रामी सतत आजारी राहू लागले. त्यांना अनेक प्रकारचा त्रास सुरु झाला. त्यामुळे ते चित्रपटांपासून दूर गेले. सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही त्यांची उपस्थिती कमी झाली. लिव्हर सोबतच त्यांना किडनीच्या आजाराने देखील ग्रासले. या आजारांमुळे ते अशक्त झाले होते. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर त्यांनी १४ एप्रिल २०११ ला या जगाचा निरोप घेतला.  आजही त्यांचे चित्रपट बघताना प्रेक्षकांना त्यांच्याबद्दल राग आणि चीड निर्माण होते इतका खरा अभिनय त्यांनी केला.

हे देखील वाचा