Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अरबाज खानने विचारला ‘तो’ प्रश्न अन् सनी लागली ढसा ढसा रडू, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

एकेकाळी टॉप एडल्ट स्टार म्हणून ओळखली जाणारी सनी लिओनी, आज बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. बॉलिवूड अभिनेत्री सनीने आपल्या आकर्षक अंदाजाने लाखो लोकांना वेड लावले आहे. तिचे चाहते तिची प्रत्येक वैयक्तिक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. सनी लिओनी हिने नुकताच आपला ४० वा  वाढदिवस साजरा केला आहे. सुंदर अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव नक्कीच घेतले जाते. इंटरनेटवर सनीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अरबाज खानच्या चॅट शोमध्ये दिसली आहे. व्हिडिओमध्ये असे दिसते की, अरबाज सनीला एक प्रश्न विचारतो, आणि सनी त्या प्रश्नावर इतकी दुःखी होते की, ती ढसाढसा रडायला लागते.

हा एक जुना व्हिडिओ आहे, ज्यामध्ये सनी पाहुणी म्हणून सामील झाली होती. व्हिडिओमध्ये अरबाजने सनीला जुन्या पोस्टवरून प्रश्न विचारला होता. प्रभाकर नाव असलेल्या व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारासाठी तिने मदत मागितली होती. जेव्हा सनीने या प्रश्नाचे उत्तर दिले, तेव्हा तिने रडायला सुरुवात केली. ती म्हणाली, ‘मी त्यांना वाचवू शकले नाही. याचे फार दुःख आहे.’

प्रभाकर यांना सनीची मुलगी निशा मामा म्हणून हाक मारायची. सनीचा तो मानलेला भाऊ होता. ती पुढे म्हणाले की, ‘प्रभाकर एका गंभीर आजाराने ग्रस्त होते, आणि त्यांची किडनी खराब झाली होती.’

सनी लिओनीच्या अभिनय करिअरची सुरुवात ‘जिस्म २’ या चित्रपटापासून झाली आहे. त्यानंतर ती ‘जॅकपॉट’, ‘रागिनी एमएमएस २’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. सनी लिओनी ही बॉलिवूडची पहिली अभिनेत्री आहे, जिने तिच्या सह-स्टारच्या एचआयव्ही चाचणीची मागणी केली होती.

सनीने मॉडेलिंग, परफॉर्मन्स, बॉलिवूड चित्रपट, अनेक रियॅलिटी कार्यक्रम यातून भरपूर कमाई केली आहे. तिचा लॉस एंजेलिसमध्ये एक आलिशान बंगला आहे, त्याची किंमत २० करोड इतकी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा