Thursday, February 12, 2026
Home बॉलीवूड कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी बिग बी पुन्हा एकदा आले धावून, थेट पोलंडवरून खरेदी केले ऑक्सिजन कंसंट्रेटर

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी बिग बी पुन्हा एकदा आले धावून, थेट पोलंडवरून खरेदी केले ऑक्सिजन कंसंट्रेटर

मागील एक वर्षापासून भारत कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. या वर्षी तर भारताची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे आणि मृत्युदरही वाढत आहेत. अनेक सोयी सुविधांचा अभाव जाणवत आहे. अनेकजण या संकटांतून भारताला बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. परदेशातून देखील मदतीचा हात पुढे आला आहे. अनेक कलाकार देखील मदत करत आहेत. यातच बॉलिवूडचे ‘बिग बी’ म्हणजेच अमिताभ बच्चन हे कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धावून आले आहे.

याआधी देखील अमिताभ बच्चन यांनी कोरोना रुग्णांना मदत केली होती. आता त्यांनी 50 ऑक्सिजन कंसंट्रेटर खरेदी केले आहेत. हे ऑक्सिजन कंसंट्रेटर त्यांनी पोलंडवरून खरेदी केले आहेत. त्यांनी गुरुवारी (१३ मे) त्यांच्या ब्लॉगवरून ही माहिती सर्वांना दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी पीडित रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडरची ऑर्डर दिली आहे.

एवढंच नाही, तर अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, पोलंडमधील रॉल्कॉ शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासने गरज लागल्यास आपात्कालीन ऑक्सिजन पाठवले जातील, असे सांगितले आहे. परंतु त्यांनी त्यांची ऑफर नाकारली. अमिताभ यांच्या मते ते हे ऑक्सिजन कंसंट्रेटर त्या संस्थांना दान करणार आहेत, ज्यांना या सगळ्याची सर्वात जास्त गरज आहे.

कोरोनाच्या संकटात त्यांनी मुंबईमधील अनेकांची काळजी घेतली आहे. त्यांनी मुंबई मधील सरकारी रुग्णालयाला 10 व्हेंटिलेटर डोनेट केले आहेत. याबाबत माहिती सांगताना त्यांनी लिहिले की, “मी जेव्हा बीएमसीला मदत करण्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी पैशांऐवजी व्हेंटिलेटर डोनेट करा असे सांगितले. मी 20 व्हेंटिलेटर ऑर्डर केले आहेत. त्यातील 10 आधीच पोहोचले आहेत आणि बाकी 10 येत्या 25 तारखेपर्यंत पोहोचतील.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चांद ये हर रोज मैं देखू..! राहुल वैद्य आणि अनुष्का सेनने सोबत गायलं रोमँटिक गाणं, पाहा व्हिडिओ

-अरबाज खानने विचारला ‘तो’ प्रश्न अन् सनी लागली ढसा ढसा रडू, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘आयुष्यात मित्र कमी आणि ट्रोलर्सच जास्त भरले आहेत’, म्हणत शालूची आपल्याच फोटोवर कमेंट

हे देखील वाचा