Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड परेश रावल यांच्या मृत्यूची पसरली अफवा, अभिनेत्यांनी पोस्ट करून दिले मजेशीर अंदाजात उत्तर; मिम्स होतायत व्हायरल

परेश रावल यांच्या मृत्यूची पसरली अफवा, अभिनेत्यांनी पोस्ट करून दिले मजेशीर अंदाजात उत्तर; मिम्स होतायत व्हायरल

कोरोना महामारीमध्ये अनेकांचे जीवन अस्तव्यस्त झाले आहे. अनेकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. या कोरोनाने अनेक कलाकारांचा देखील बळी घेतला आहे. अशातच आता अनेक कलाकारांचा मृत्यू झाल्याच्या अफवा सर्वत्र पसरत आहे. नुकतेच अभिनेते परेश रावल यांनी एक व्हायरल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये चक्क त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या पोस्टला परेश रावल यांनी स्वतः मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे. यांनतर त्यांच्या चाहत्यांनी या पोस्टवर मिम्स करून मजा घेतली आहे.

परेश रावल यांनी जी पोस्ट शेअर केली आहे. ज्या पोस्टमध्ये त्यांचा फोटो फ्रेम केला होता. या सोबतच असे लिहिले होते की, “आज दिनांक 14/05/2021 रोजी सकाळी 7:30 वाजता चित्रपटसृष्टीचा भाग असणारे परेश रावल यांचा मृत्यू झाला आहे.” यासोबतच मेणबत्तीसह त्यांना श्रद्धांजली अर्पण केली‌‌ आहे.

यामध्ये असे लिहिले होते की, “अत्यंत दुःखी मनाने हे कळवण्यात येते की, चित्रपटसृष्टीचा भाग असणारे परेश रावल हे आता आपल्यात राहिले नाही.” परेश रावल यांनी स्वतः कमेंट केली की, “गैरसमजांबद्दल क्षमस्व. मी तर सकाळी 7 वाजता झोपलो.”

परेश रावल हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांच्या ट्विटद्वारे त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. तसेच अनेक चालू घडामोडींवर देखील ते त्यांचे मत मांडताना दिसतात. त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ते लवकरच फरहान अख्तर याच्या ‘तुफान’ या चित्रपटात दिसणार आहे. ते या चित्रपटात एका बॉक्सिंग कोचच्या भूमिकेत दिसणार आहेत.

परेश रावल यांच्या आधी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. त्यानंतर तिने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर करून ती जिवंत असल्याचा पुरावा सर्वांना दिला होता. तसेच महाभारतातील भीष्म पितामह यांची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांच्या निधनाची अफवा देखील पसरली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आजही सुशांतला आपला आवडता सहकारी अभिनेता मानते अंकिता लोखंडे; म्हणाली…

-ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर

-‘या गरीब मुलासोबत काय करतेय?’ बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल

हे देखील वाचा