Saturday, April 19, 2025
Home अन्य जन्नत झुबेर रहमानीचा डान्स व्हिडिओ व्हायरल; पण अभिनेत्रीच्या आईनेच वेधले नेटकऱ्यांचे लक्ष!

जन्नत झुबेर रहमानीचा डान्स व्हिडिओ व्हायरल; पण अभिनेत्रीच्या आईनेच वेधले नेटकऱ्यांचे लक्ष!

टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री जन्नत झुबेर रहमानी ही सध्या सोशल मीडियावर धमाल करत आहे. दरदिवशी तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत राहतात. जन्नत सोशल नेटवर्किंग साईट इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते.

त्याचवेळी, जन्नतच्या डान्सचा एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिची आईही दिसली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये जन्नतने जबरदस्त डान्स केला आहे, परंतु व्हिडिओमध्ये दिसणार्‍या तिच्या आईने नेटकऱ्यांचे संपूर्ण लक्ष वेधून घेतले आहे. होय, व्हिडिओमधील जन्नतच्या आईच्या एक्सप्रेशन्सवर चाहते फिदा झाले आहेत. नेटकऱ्यांना जन्नतच्या डान्सपेक्षा, तिच्या आईचे एक्सप्रेशन्स आवडले आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत जन्नतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या गाण्यावर एक सुंदर डान्स लवकरच येणार आहे. हा व्हिडिओ फक्त यासाठी, कारण आईला माझ्या डान्समध्ये काहीच रस नव्हता.” २ दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर आतापर्यंत १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये चाहते जन्नतच्या आईचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

अवघ्या १९ वर्षांची जन्नत आठ वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. टीव्ही मालिका ‘फुलवा’ च्या माध्यमातून तिला खूप प्रेम मिळाले. टेलिव्हिजनवर सतत सक्रिय असणारी जन्नत काही मालिकेमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणूनही दिसली आहे. जन्नतने ‘हार जीत’, ‘फियर फाईल्स’, ‘एक थी नायका’, ‘बेस्ट ऑफ लक निक्की’, ‘महाराणा प्रताप’, ‘महा कुंभ’, ‘सावधान इंडिया’, ‘कोड रेड’, ‘गुमराह’, ‘तुझसे नाराज नही जिंदगी’, ‘शनी’, ‘तू आशिकी’, ‘आप के आ जाने से’, ‘खतरा खतरा’ यांसारख्या मालिकेमध्ये काम करून लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन

-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल

हे देखील वाचा