बॉलिवूडसाठी मागील एक वर्षापासून जणू काही दु:खाचा डोंगरच कोसळत आहे. कोरोनामुळे, तर वेगळ्याच आजारामुळे कलाकार या जगाचा निरोप घेत आहे. यासोबतच त्यांच्यासोबत काही कलाकार असेही आहेत, ज्यांनी आपले मॅनेजर, मेकअप आर्टिस्टला गमावले आहे. अशातच आता नुकतेच वृत्त आले आहे की, दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांचे मेक आर्टिस्ट शशि दादा यांचे निधन झाले आहे. याची माहिती स्वत: त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. विशेष म्हणजे शशि दादा हे जॅकी यांच्यासोबत ३७ वर्षांपासून काम करत होते.
जॅकी श्रॉफ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती देत लिहिले की, “शशि दादा नेहमीच माझ्या हृदयात राहतील. ३७ वर्षे माझ्यासोबत असणाऱ्या मेकअप आर्टिस्टचे निधन झाले आहे.”
Shashi Dada ????Will always be in deepest corner of my Heart❤️
My make up person for 37 years passed away. pic.twitter.com/Oo7VED7eWr
— Jackie Shroff (@bindasbhidu) May 18, 2021
त्यांच्या या ट्विटनंतर युजर्सही यावर प्रतिक्रिया देत आहेत. सोबतच अभिनेत्याचे चाहतेही आपला शोक व्यक्त करत आहेत. तब्बल ३७ वर्षे शशि दादा जॅकी यांच्यासोबत काम करायचे. त्यामुळे आता त्यांच्या जाण्याने जॅकी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जॅकी श्रॉफ यांनी आपल्या ट्विटमध्ये शशि दादा यांचा फोटोचाही समावेश केला आहे. फोटोत ते दोघेही एकसोबत दिसत आहेत. ते शशि दादा यांच्याशी काहीतरी बोलताना दिसत आहेत. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, त्यांच्यासोबत जॅकी यांचे किती घट्ट नाते झाले होते. दोघांमध्ये केवळ व्यावसायिकच नाही, तर वैयक्तिक संबंधही होते.
With heavy heart I bid farewell to my associate of 40 yrs, my secretary, dedicated, hard working, tireless Mehta ji. He was more a part of my family We lost him to covid. He is irreplaceable & leaves a void that cannot be filled, ever???? pic.twitter.com/QtGixciP3S
— Hema Malini (@dreamgirlhema) May 8, 2021
यापूर्वी ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांच्या सेक्रेटरीचे निधन झाले होते. त्यांनी ट्विटरवरून आपल्या सेक्रेटरी यांच्यासोबतचा फोटो शेअर करत एक भावुक संदेशही लिहिला होता. विशेष म्हणजे ते ४० वर्षांपासून काम करत होते. त्यांच्या निधनामुळे अभिनेत्रीला खूप दु: ख झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी
-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन
-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल