‘सरदार जी 3’ (‘Sardaar Ji 3) पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाली आहे. या चित्रपटाला तिथे जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. तिथे चित्रपटाचे सर्व शाे हाऊसफुल्ल चालले आहेत.
‘सरदार जी 3’ या पंजाबी चित्रपटाबद्दल भारतात वाद सुरू आहे. कारण या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर हिला घेतलंय, म्हणून हा चित्रपट भारतात प्रदर्शित झालाच नाही. इतकचं काय, ट्रेलरही यूट्यूबवर टाकलेला नाही. पण आता हा चित्रपट परदेशात प्रदर्शित झालाय आणि जाेरदार कमाई करत आहे. पाकिस्तानमध्ये तर एकदम गडबड उडवून दिलीये, तिथं पहिल्याच दिवशी 3 काेटींची कमाई झालीये !
आता या चित्रपटात लीड राेल करणारा गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ ने पाकिस्तानी प्रेक्षकांचे रिएक्शन शेअर केलीये. लाेकांना चित्रपट खूप आवडताेय असं दिसतयं ! दिलजीतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ परत शेअर केलाय, ज्यामध्ये पाकिस्तानमधल्या सिनेमागृहामध्ये लाेकांची भारी रिएक्शन दिसतीये. त्या व्हिडीओत हानिया आमिरचा सीन आहे आणि सिनेमागृह फुल्ल भरलेलं आहे.
या व्हिडीओला दिलजीतने कॅप्शन दिलयं, “देशात सगळ्यात जास्त 12 शाे अल्ट्रा स्क्रीन वर चालू आहेत. ‘सरदार जी 3’ ला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताेय. चला, तुम्हीही जाऊन चित्रपट बघा !” ‘सरदार जी 3’ चित्रपटाचं बाॅक्स ऑफिसवर जाेरदार कलेक्शन चाललंय. फक्त दाेन दिवसांत परदेशात या चित्रपटानं 11.03 काेटी रुपयांची कमाई केलीये. पहिल्या दिवशी 4.32 काेटी, तर दुसऱ्या दिवशी 6.71 कोटी कमावले.
आपल्याकडे काही वर्षांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्लयानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली हाेती. अशा वेळी जेव्हा दिलजीत दोसांझ आणि पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर यांचा चित्रपट येताेय असं कळालं, तेव्हा वाद झाला. म्हणून हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यात आला नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
काजोलच्या सरजमीन सिनेमाचा टीझर प्रदर्शित; लोक म्हणाले हा तर फना 2…










