सलमान खानचा (Salman Khan) फेमस शो ‘बिग बॉस 19’ (Big Boss 19) चा पहिला प्रोमो अखेर बाहेर आलाय! या प्रोमोमध्ये काही भन्नाट आणि नव्या गोष्टी दिसतायत, ज्या यावेळी शोमध्ये मोठा बदल घेऊन येणार आहेत.
टीव्हीवरचा सगळ्यात फेमस आणि नेहमीच चर्चेत राहणारा शो ‘बिग बॉस’ आता परत येतोय आणि तोही थेट सीझन 19 घेऊन! चाहते जेवढ्या दिवसांपासून वाट पाहत होते, तो पहिला प्रोमो शेवटी आज म्हणजेच 25 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे.हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय.यावेळी शोमध्ये काही मोठे आणि भन्नाट बदल दिसतायत जे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतायत!
‘बिग बॉस 19’ चा नवा प्रोमो जिओ सिनेमाने त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये शोचं नवं लोगो दिसतंय आणि यावेळी बिग बॉसच्या डोळ्यात भरपूर रंग भरले गेलेत! हे बघून एकदम लक्षात येतं की,यंदाचा शो खूप धमाल आणि रंगीत एंटरटेनमेंट घेऊन येणार आहे. प्रोमो शेअर करताना त्यांनी असं लिहिलंय,”काउंटडाऊन सुरू झालाय,आता तहलका होणार अनलॉक! जोडलेले राहा…”
हा प्रोमो पाहून चाहते एकदम खुश आणि उत्सुक झालेत! बिग बॉस 19चं हे सीझनही नेहमीप्रमाणे सलमान खानच होस्ट करणार,अशी चर्चा सध्या सुरू आहे.पण अजून मेकर्सकडून काहीही ऑफिशियल घोषणा झालेली नाहीये. माहिती अशी आहे की,सलमानच्या पुढच्या चित्रपटांचं शूटिंग शोच्या दरम्यान असणार आहे.
म्हणून काही काळासाठी शोचं होस्टिंग फराह खान, करण जोहर किंवा अनिल कपूर यांच्याकडे देण्यात येऊ शकतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 19’ हा शो ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊ शकतो. सुरुवातीला तो जिओ सिनेमा वर स्ट्रीम केला जाईल आणि नंतर कलर्स टीव्हीवर दाखवला जाणार आहे.अजून पर्यंत शोची पक्की तारीख जाहीर झालेली नाही,पण चर्चा आहे की शो 29 किंवा 30 ऑगस्टपासून सुरू होऊ शकतो.प्रोमो पाहिल्यानंतर सगळेच आता खूप उत्सुकतेनं शोची वाट पाहत आहेत!
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










