बॉलिवूडमध्ये बर्याच परदेशी मुलींनी आपले नशीब आजमावले, ज्यातल्या काहींनी केवळ इंडस्ट्रीतच नव्हे तर प्रेक्षकांच्या हृदयातही आपले स्थान निर्माण केले. तसेच काहीजणींची कारकीर्द एक किंवा दोन चित्रपटांपुरतीच मर्यादित राहिली. यापैकीच एक नाव बार्बरा मोरी आहे. जी बॉलिवूडमध्ये वादळासारखी आली होती, परंतु त्यानंतर ती कुठे गायब झाली, हे क्वचितच लोकांना माहिती असेल. बार्बरा मोरीने ऋतिक रोशनसोबत ‘काईट्स’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती, ज्यामध्ये ऋतिक आणि बार्बरासोबत कंगना रणौत देखील दिसली होती.
बार्बरा मोरीने ऋतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यासोबत ‘काईट्स’ चित्रपटाने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘काईट्स’मध्ये ऋतिक रोशनसोबत रोमान्स करणार्या बार्बरा मोरीबद्दल अशाही काही गोष्टी आहेत, ज्यांच्याबद्दल क्वचितच लोकांना माहिती असेल.
हा चित्रपट रिलीझ होऊन जवळपास 11 वर्षे झाली आहेत, पण त्यानंतर अभिनेत्री कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. बार्बरा जरी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली, तरीही ती मेक्सिकन चित्रपटांचा एक महत्त्वाचा भाग नक्कीच आहे.
बार्बरा १९९६ मध्ये सर्जिओ मेअरसोबत रिलेशनशिप मध्ये होती. ज्याच्यापासून तिला सर्जिओ मेअर मोरी नावाचा एक मुलगा देखील आहे. त्याचा जन्म १९९८ मध्ये झाला होता. विशेष म्हणजे सर्जिओ मेयर मोरीलाही एक मुलगी आहे, तिचे नाव मिला मेयर सबटिल आहे.
मिला मेयर सबटिलचा जन्म २०१६ मध्ये झाला होता. म्हणजेच बार्बरा ३९ वर्षांची असताना ती आजी झाली होती. ती सध्या ४३ वर्षांची आहे. पहिल्या रिलेशनशिपनंतर बार्बराने बास्केटबॉल खेळाडू केनेथ रे सिगमनशी २०१६ मध्ये लग्न केले होते. त्यानंतर एकाच वर्षाने, म्हणजेच २०१७ मध्ये दोघे विभक्त झाले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक
-प्रसिद्ध गायिकेला करावा लागला होता लैंगिक शोषणाचा सामना, वयाच्या १९ व्या वर्षी होती गरोदर










