बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना महामारीच्या काळात खरा हिरो ठरला आहे. गेल्या वर्षापासून, तो लोकांना मदत करण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत आहे. केवळ सामान्य माणसेच नव्हे, तर बरेच कलाकारही त्याच्याकडे मदतीसाठी विनंती करताना दिसले आहेत. अलीकडेच भारतीय लष्कराच्या एका कमांडिंग अधिकाऱ्याने कोव्हिड सुविधेसाठी सोनूकडे मदत मागितली आहे. त्यांनी पत्र लिहून सोनूला मदतीसाठी आवाहन केले आहे. मात्र, कमांडिंग अधिकाऱ्याने सोनूकडे मदत मागणे, हे इतर अधिकाऱ्यांना आवडले नाही.
सोनू सूदला लिहिले पत्र
कमांडिंग ऑफिसरने लिहिलेल्या या पत्रात, बॉलिवूड स्टार सोनू सूदकडे कोव्हिड- १९ सुविधेसाठी उपकरणे खरेदी करण्याची मदत मागितली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, बटालियनच्या सीओच्या वतीने १३ मे रोजी लिहिलेल्या एका पत्रात, फिल्म स्टार सोनू सूदला सांगितले गेले की, जैसलमेर लष्करी स्थानकात २०० बेडचे कोव्हिड केअर सेंटर बांधण्यात येत आहे.
पत्र लिहून मागितली मदत
त्यांनी सोनू सूदकडे रुग्णालयासाठी आवश्यक अशी काही उपकरणे उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. ज्यात ४ आयसीयू बेड, १० ऑक्सिजन कंसंट्रेटर, १० जंबो ऑक्सिजन सिलिंडर, १ एक्स-रे मशीन आणि दोन १५ केव्हीए जनरेटर सेटचा समावेश आहे. सूदचे हे काम कायम लक्षात ठेवले जाईल, असेही पत्रात म्हटले आहे.
अधिकाऱ्यांनी दिली सफाई
अहवालात सैन्य मुख्यालय नवी दिल्लीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्टी करत सांगितले की, सोनू सूदला पत्र लिहिले गेले होते. परंतु ते म्हणाले की, असे वाटते की हे पत्र अत्यंत उत्साहात लिहिले गेले आहे. नागरी राज्य प्रशासनास मदत करण्यासाठी सैन्याने आपल्या संसाधनांसह देशभरात अनेक कोव्हिड रुग्णालये स्थापन केली आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्येही ५० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे.
सोनू सूदने श्रीगंगानगरला पाठवली होती मदत
अलीकडेच सोनू सूदने राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील एका आजारी वृद्ध महिलेला मुंबईतून मदत पाठवली होती. कोरोनानंतर सोनूने काळ्या बुरशीने ग्रस्त महिलेला मुंबईहून उड्डाणाद्वारे जयपूर व नंतर जयपूरहून कारद्वारे श्रीगंगानगरला आवश्यक इंजेक्शन पाठवून मोठा दिलासा दिला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कपूर बहिणींनी शेअर केला आजी- आजोबांचा फोटो; पाहून तुम्हीही म्हणाल ‘एकच नंबर’
-‘भाभी जी घर पर है’मधील नवीन ‘गोरी मेम’ सोडतेय मालिका? नेहा पेंडसेने सांगितले सत्य
-गुणी मुलगी! आपल्या वडिलांची ‘ही’ इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीति झिंटाने खरेदी केली होती आयपीएल टीम










