Monday, April 20, 2026
Home बॉलीवूड जेव्हा सासरच्या लोकांपुढे शाहरुखने गौरीला म्हटले होते, ‘चल बुरखा घाल आणि नमाज वाच’, अभिनेत्याने मुलाखतीत केला होता खुलासा

जेव्हा सासरच्या लोकांपुढे शाहरुखने गौरीला म्हटले होते, ‘चल बुरखा घाल आणि नमाज वाच’, अभिनेत्याने मुलाखतीत केला होता खुलासा

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान एक असा स्टार आहे, ज्याने पडद्यासोबतच खऱ्या आयुष्यातही प्रत्येक क्षणी प्रेमाचे आणि रोमान्सचे जीवन जगले आहे. गौरी हिंदू आहे, तर शाहरुख खान एक मुस्लिम आहे. यामुळे या दोघांना लग्नासाठी कुटुंबासमोर खूप संघर्ष करावा लागला, पण दोघांनीही हार मानली नाही. दोघेही २९ वर्षांपासून एकमेकांसोबत राहत आहेत आणि आयुष्य आनंदाने जगत आहेत.

आजही भारतात हिंदू- मुस्लिम विवाह हा एक मोठा मुद्दा मानला जातो. अशा परिस्थितीत, आम्ही शाहरुख खानच्या विवाहाशी संबंधित एक अतिशय रंजक किस्सा घेऊन आलो आहोत. हा किस्सा आहे, शाहरुख आणि गौरीच्या रिसेप्शनचा. या सोहळ्यात शाहरुख त्याच्या नातेवाईकांच्या हिंदू- मुस्लिम विवाहावरील गप्पांमुळे इतका त्रस्त झाला की, तो गौरीला भर सोहळ्यात म्हणाला, चल बुरखा घाल आणि नमाज वाच. स्वत: शाहरुख खानने हा खुलासा अभिनेत्री फरीदा जलालसोबत एका जुन्या मुलाखतीत केला होता.

दोघेही एकमेकांच्या धर्मांचा आदर करतात. शाहरुखने सांगितले की, त्याने लग्नात सासरच्या लोकांसोबत म्हणजेच गौरीच्या कुटुंबासोबत एक मस्करी केली होती. तो म्हणाला, “मला आठवते की, तिचे संपूर्ण कुटुंब जुन्या पद्धतीचे आहे. मी त्या सर्वांचा आदर करतो आणि त्यांच्या विश्वासाचा आदर करतो. आम्ही जुन्या रिसेप्शनमध्ये बसलो होतो. जेव्हा मी तिथे आलो, तेव्हा लोक कुजबुज करायला लागले की, हा मुस्लिम आहे. हा मुलीचे नाव बदलून टाकेल. गौरी आता मुस्लिम झाली का.”

शाहरुख खानने सांगितले की, यावेळी गौरीच्या कुटुंबीयांची मस्करी करण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला. तो म्हणाला की, “मी गौरीला बुरखा घालून नमाज वाचण्यास सांगितले.” इतकेच नाही तर शाहरुखने गौरीचे नाव बदलण्याची देखील मस्करी केली. शाहरुख त्या सोहळ्यात म्हणाला की, “आजपासून तुझे नाव आयशा आहे.” तो म्हणाला, “गौरीच्या कुटुंबाला वाटले की मी तिचे धर्म परिवर्तन केले आहे. मी एक विनोद करत म्हणालो की, आतापासून ती सर्व वेळ बुरख्यामध्ये राहील आणि ती तोपर्यंत घराच्या बाहेर पडणार नाही, जोपर्यंत ती तिचे नाव आयशा ठेवत नाही.”

खरा देशभक्त आहे शाहरुख खान
तसे तर शाहरुख खान त्याच्या प्रत्येक स्टाईलमुळे चर्चेत असतो. मात्र, तो हृदयापासून भारतीय असल्याची बाब, खास करून चाहत्यांना पसंत पडते. शाहरुख एकदा रियॅलिटी शोमध्ये म्हणाला होता की, “आम्ही हिंदू-मुस्लिम बद्दल कधीच बोललो नाही. माझी पत्नी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे आणि माझी मुले हिंदुस्तानी आहेत.” शाहरुखचे हे बोलणे ऐकताच, तिथे उपस्थित सर्व टाळ्या वाजवू लागले.

शाहरुख पुढे म्हणाला, “एकदा सुहाना लहान होती तेव्हा तिला फॉर्ममध्ये धर्म भरायचा होता. तिने मला विचारले, पप्पा आपण कोणत्या धर्माचे आहोत. मी तिला सांगितले की, आपण भारतीय आहोत. कोणताही धर्म नाही आणि नसायलाच हवा.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा