चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ आता रिलीजसाठी सज्ज असून, चित्रपटाशी संबंधित अपडेट्स सातत्याने समोर येत आहेत. शीर्षकगीत आणि ‘हम दोनो’ या गाण्यांनी आधीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता चित्रपटाचे तिसरे गाणे ‘तेनु ज्यादा मोहब्बत’ रिलीज करण्यात आले असून, हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
या गाण्याच्या रिलीजपासूनच गायक तलविंदर सिंग चर्चेचा विषय ठरला आहे. कारण आजवर कोणीही त्यांचा चेहरा पाहिलेला नाही. तलविंदर नेहमीच सांगाड्याचा रंगवलेला मुखवटा घालून सादरीकरण करतो. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी त्याची तुलना थेट अभिनेता कार्तिक आर्यन याच्याशी केली आहे. काही जण तर तलविंदर आणि कार्तिक आर्यन एकच व्यक्ती असल्याचा दावा करत आहेत.
सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तलविंदर स्टेजवर मुखवटा घालून गाताना दिसतो. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तुम्ही कधी विचार केला आहे का की कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)आणि तलविंदर कधीही एकाच ठिकाणी का दिसले नाहीत?” यामुळे चर्चेला अधिकच उधाण आले आहे. अनेकांच्या मते तलविंदरचा चेहरा, शरीरयष्टी, चालण्याची पद्धत आणि हास्य कार्तिक आर्यनसारखेच आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील मजेशीर आहेत. एका युजरने लिहिले, “यामागचं सत्य जाणून घ्यायला हवं.” दुसऱ्याने म्हटले,म्हणजे शक्तिमानच गंगाधर आहे!” तर काहींनी स्पष्टपणे लिहिले, कार्तिक आर्यन म्हणजेच तलविंदर. मात्र काही लोकांनी वेगळे मत मांडत, “फक्त दिसणं जुळतं म्हणून ते एकच असतील असं नाही, असेही सांगितले.
दरम्यान, तलविंदर सिंग स्वतः या मुखवट्यामागील अर्थाबद्दल सहमत असल्याचे समोर आले आहे. एका इंस्टाग्राम युजरने मुखवट्यामागील भावना स्पष्ट करत पोस्ट केली होती, ज्यावर तलविंदरने स्वतः “हो सर! तुम्ही बरोबर समजले,” अशी प्रतिक्रिया दिली.
23 नोव्हेंबर 1997 रोजी जन्मलेले तलविंदर सिंग सिद्धू हे भारतीय गायक, गीतकार आणि संगीत निर्माता आहेत. त्यांचे संगीत इलेक्ट्रॉनिक, हिप-हॉप, ट्रॅप, लो-फाय आणि सिंथ-पॉपचे मिश्रण आहे. पंजाब आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यान वाढलेल्या तलविंदरचा हा मुखवटा केवळ गूढतेसाठी नसून, लूकपेक्षा भावना महत्त्वाच्या असल्याचे तो मानतो.आज तलविंदरचे सोशल मीडियावर 6.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि तो पॉप म्युझिकच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
शाहरुख खानची संपत्ती हजारो कोटींवर; बिलेनियर क्लबमध्ये थेट एन्ट्री, ठरला सर्वात श्रीमंत अभिनेता










