सलमान खान शेवटचा ‘सिकंदर’ या चित्रपटात झळकला होता, मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षित कमाल करू शकला नाही. आता या चित्रपटानंतर सलमान खान पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपट ‘बैटल ऑफ गलवान ’ मुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू असून, सेटवरील काही फोटो आधीच समोर आले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
दरम्यान, आता अशी चर्चा आहे की सलमान खानच्या (Salman Khan)वाढदिवसादिवशी, म्हणजेच 27 डिसेंबर रोजी ‘बैटल ऑफ गलवान’चा टीझर रिलीज होऊ शकतो. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेकर्स सलमानच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाहत्यांना खास भेट देण्याच्या तयारीत आहेत.
‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, ‘बैटल ऑफ गलवान’चा टीझर 27 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्याची योजना आहे. मेकर्स गेल्या काही दिवसांपासून यासाठी तयारी करत असून, काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सलमान खानच्या वाढदिवसादिवशी खरंच टीझर रिलीज होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘बैटल ऑफ गलवान’ हा चित्रपट 2020 साली गलवान खोऱ्यात घडलेल्या भारत-चीन संघर्षावर आधारित आहे. या घटनेत भारतीय सैन्याने दाखवलेले शौर्य आणि बलिदान संपूर्ण देशाने पाहिले होते. या संघर्षात बिहार रेजिमेंटचे कर्नल संतोष बाबू यांनी जवानांचे नेतृत्व केले होते. चित्रपटात हेच दमदार पात्र सलमान खान साकारणार आहे.
काही दिवसांपूर्वी सलमान खानने लद्दाखमधील शूटिंगदरम्यानचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते, ज्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत असून, सलमान खानसोबत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिलाष चौधरीही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.आता सलमान खानच्या वाढदिवसादिवशी ‘’चा टीझर रिलीज होतो का, याकडे संपूर्ण बॉलीवूड आणि चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
६ वर्षांनंतर प्रियंका चोप्राची बॉलिवूडमध्ये घरवापसी; 1300 कोटींच्या भव्य चित्रपटाला दिला होकार


