बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत तिचे फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. पण आता ते सगळे सुखरूप बाहेर पडले आहेत. या गोष्टीची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. ती सध्या ‘सुपर डान्सर 4’ या शोला जज करत आहे. तिने या शोमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो तिचा मुलगा विहान याने बनवला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी थॉर राग्नारोक चित्रपटातील हेलाच्या अवतारात दिसत आहे.
शिल्पा शेट्टीने हा व्हिडिओ शेअर करून सांगितले आहे की, हा व्हिडिओ तिच्या मुलाने बनवला आहे. या व्हिडिओमधून तिने आभार व्यक्त केले आहे. तिने सांगितले आहे की, कोव्हिड काळात त्यांनी कशाप्रकारे आशा ठेवून उद्याच्या चांगल्या भविष्याचा विचार केला होता.
तिने हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले की, “विहानने या व्हिडिओमधून माझ्या चेहऱ्यावर एक हसू आणले आहे. यामध्ये त्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, कोव्हिड काळात कशाप्रकारे त्याच्या मम्मीने सगळं सांभाळलं. सगळे निगेटिव्ह. पण आता सगळे सकारात्मक होऊन चांगल्या भविष्याचा विचार करत आहे.”
हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. या सोबतच शिल्पाचा पती राज कुंद्रा याने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये विहान दुरूनच त्याच्या आईच्या डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा हिरव्या स्क्रीन समोर डान्स करताना दिसत आहे. राजने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पडद्याच्या मागे खरचं. थ्रो बॅक मस्ती, जशी आई तसाच मुलगा.”
या आधी देखील शिल्पा शेट्टीने तिचा मुलगा विहान आणि मुलगी समिशा सोबत एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये विहान हातात नारळ पाणी घेतलेला दिसत आहे. समिशा तिच्या भावाच्या हातातील नारळ पाणी घेण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला विहान तिच्या सोबत बोलतो आणि नंतर एका अनोख्या पद्धतीने तिला नारळ पाणी पाजतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










