भारतीय बॉक्स ऑफिसच्या इतिहासात आता आणखी एक नवं पर्व लिहिलं गेलं आहे. रणवीर सिंहच्या बहुचर्चित चित्रपट ‘धुरंधर’ने रविवारी मोठा टप्पा गाठत कन्नड सुपरहिट ‘KGF: Chapter 2’च्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे. यासह ‘धुरंधर’ने भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 चित्रपटांमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे.
या यशाला अधिक खास बनवते ती म्हणजे चित्रपटाची कायम राहिलेली गती. रिलीज होऊन एक महिना पूर्ण झाला असतानाही ‘धुरंधर’ (Dhurandhar)जगभरात दररोज सुमारे 20 कोटी रुपयांची कमाई करत आहे. वीकडेमध्ये कमाईचा वेग थोडा कमी झाला असला तरी सध्याचा ट्रेंड पाहता चित्रपटाकडे अजूनही वर जाण्याची पूर्ण क्षमता आहे.
रविवारी ‘धुरंधर’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ₹12.75 कोटी नेट कमावले, तर ओव्हरसीजमधून सुमारे 5 लाख डॉलरची भर पडली. अवघ्या 31 दिवसांत चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन ₹1207 कोटींवर पोहोचलं आहे. यामुळे 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘KGF: Chapter 2’च्या ₹1200 कोटींच्या अंतिम आकड्याला मागे टाकण्यात यश आलं. याआधीच ‘जवान’, ‘कल्कि 2898 AD’ आणि ‘पठान’सारख्या मोठ्या हिट्सनाही ‘धुरंधर’ने मागे सोडलं होतं.
या यशासह रणवीर सिंहने कमाईच्या बाबतीत शाहरुख खान, सलमान खान, यश आणि रणबीर कपूर यांच्या सर्वात मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकलं असून, हा त्यांच्या करिअरमधील ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
सध्या ‘धुरंधर’च्या पुढे फक्त चार दिग्गज चित्रपट आहेत — आमिर खानचा ‘दंगल’ (₹2070 कोटी), एस.एस. राजामौली यांचा ‘बाहुबली 2’ (₹1788 कोटी), ‘पुष्पा 2’ (₹1742 कोटी) आणि ‘RRR’ (₹1230 कोटी). सध्याची कमाईची गती कायम राहिली तर येत्या काही दिवसांत ‘धुरंधर’ ‘RRR’चा विक्रमही मोडू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं झाल्यास ‘धुरंधर’ भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात आणखी भक्कमपणे आपलं नाव कोरणार, यात शंका नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
घोड्यावर स्वार होऊन अवतरले शिवराय; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ने निर्माण केला ऐतिहासिक जल्लोष










