अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. या चित्रपटात अगस्त्य नंदाने शहीद अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया झळकली असून, हा तिचा बॉलिवूडमधील पदार्पणाचा चित्रपट आहे. विशेष म्हणजे, हा दिवंगत ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. रिलीजपूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतल्याने या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या.
ओपनिंग वीकेंडनंतर आता ‘इक्कीस’ वर्किंग डे मध्ये दाखल झाला असून, बॉक्स ऑफिसवर चित्र काहीसे निराशाज, दिसत आहे. रविवारी चित्रपटाने 5.70 कोटींची कमाई केली होती, मात्र सोमवारी येताच कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली. कमर्शियल दृष्टिकोनातून हा सोमवार चित्रपटासाठी संघर्षमय ठरला.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पहिल्या सोमवारी ‘इक्कीस’ला 2 कोटींचाही टप्पा पार करता आला नाही. पाचव्या दिवशी चित्रपटाने केवळ 1.32 कोटींची कमाई केली. नववर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर दम तोडताना दिसत आहे. सोमवारपर्यंत ‘इक्कीस’ने एकूण सुमारे 23 कोटींची कमाई केली आहे.
श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘इक्कीस’ने पहिल्या दिवशी 7.28 कोटींची ओपनिंग केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 4.02 कोटी, तिसऱ्या दिवशी 5.05 कोटी आणि चौथ्या दिवशी 5.70 कोटींची कमाई झाली. मात्र, सोमवारपासून प्रेक्षकसंख्या झपाट्याने कमी होत गेली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचा बजेट सुमारे 60 कोटी रुपये आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत ‘इक्कीस’ अजूनही आपल्या बजेटपासून खूपच दूर आहे. दुसरीकडे, सिनेमागृहांमध्ये ‘धुरंधर’ची क्रेझ कायम असून, महिनाभरापूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 1200 कोटींचा आकडा पार केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अनिल कपूर २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘शिवाजी राव’च्या भूमिकेत धमाल करणार, ‘नायक २’ निश्चित










